मुंबई : दिवाळीनंतर शहरात मधुमेहाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दिवाळीत हाय कोलेस्ट्रॉल असलेले पदार्थ मोठ्या प्रमाणात आहारात आल्यामुळे ही समस्या उद्भवल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
बहुतांश रुग्णांची ब्लड शुगर वाढल्याची तक्रार होती. तसेच ताप, मूत्रपिंडाला त्रास आणि त्वचा विकारसारख्या समस्याही उद्भवल्याचे डॉक्टरांनी सांगितले. गेल्या दोन वर्षांनंतर यंदाची दिवाळी निर्बंधमुक्त साजरी झाली. एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की, दिवाळीमध्ये गोडधोड पदार्थ बनवण्याची प्रथा आहे आणि एकमेकांना मिठाईही मोठ्या प्रमाणात भेट म्हणून दिली जाते.
चार-पाच दिवसांत मोठ्या प्रमाणावर ड्राय फ्रूट, गोड पदार्थांच्या सेवनामुळे मुंबईकरांमध्ये रक्तातील साखर वाढल्याच्या तक्रारी आल्या. दिवाळीनंतर दिवसाला सुमारे ५० रुग्ण उपचारासाठी येत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण सुमारे ३०० पेक्षा जास्त असल्याचे दिसून आले. तसेच काहींमध्ये मधुमेह असल्याचेही आढळले.
आजारावर नियंत्रण असावे
रक्तातील साखर नियंत्रणासाठी आहारावर नियंत्रण गरजेचे आहे. तसेच ही वाढलेली साखर नियंत्रणात येण्यासाठी चार आठवड्यांचा कालावधी लागण्याची शक्यता असते, असे मत डॉक्टरांनी व्यक्त केले. दिवाळीनंतरही फराळावर जोर असतो. पण या खाद्यपदार्थांचे सेवन करताना नियंत्रण असावे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला. तसेच काही शारीरिक कसरत केल्यासही रक्तातील साखर नियंत्रणात राहते, असे डॉक्टरांनी सांगितले.
त्यामुळे उद्भवली समस्या
दिवाळीत मधुमेह रुग्णांमध्ये आहारावर नियंत्रण राहत नाही आणि त्यामुळे त्यांंच्या रक्तातील सारखरेचे प्रमाण वाढले. दारूचे सेवन, अपुरी झोप आणि शारीरिक हलचाली कमी होत असल्यामुळे असे विकार जडतात. डॉक्टरांनी सांगितले की, दिवाळीनंतर दररोज १० ते १५ रुग्ण रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याच्या तक्रारी घेऊन येतात.
तीन प्रकारचे आढळले रुग्ण
गेल्या दोन वर्षांत कोरोना निर्बंधामुळे अनेकजण दिवाळीत बाहेर पडू शकले नाहीत. त्यामुळे मिठाई, फराळ यासारख्या खाद्यपदार्थांची देवाण-घेवाण फार कमी प्रमाणात झाली. पण यंदाचे चित्र वेगळे आहे. यावेळी तीन प्रकारचे रुग्ण आढळले, असे काही डॉक्टरांनी सांगि