Join us

असुरक्षित वाटल्यास हेल्प लाइनला संपर्क करा; रेल्वे सुरक्षा बलाचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 2:57 AM

मुंबई शहर आणि उपनगरात नाइटलाइफ सुरू झाली आहे. मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा बल रेल्वे स्थानकावर रात्रीच्या वेळी जादा पहारा देणार आहे.

मुंबई : नाइटलाइफमध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न मुंबईकरांकडून उपस्थित करण्यात आला. यावर उपाययोजना म्हणून रेल्वे स्थानक आणि परिसरात रेल्वे सुरक्षा बल तैनात केले आहे. यासह असुरक्षित वाटल्यास रेल्वेच्या हेल्पलाइनला संपर्क करा, असे आवाहन महिलांना केले आहे.मुंबई शहर आणि उपनगरात नाइटलाइफ सुरू झाली आहे. मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा बल रेल्वे स्थानकावर रात्रीच्या वेळी जादा पहारा देणार आहे.लोकलमध्ये प्रवाशांना विशेषत: महिलांना असुरक्षित वाटल्यास त्यांनी हेल्पलाइनला संपर्क साधावा. तत्काळ मदत पोहोचविण्यात येईल.महिला प्रवासी घरी पोहोचेपर्यंत तिची विचारपूस रेल्वे नियंत्रण कक्ष करेल. लोकलच्या डब्यात सुरक्षा कर्मचारी तैनात असतील, अशी माहिती मध्य रेल्वेचे विभागीय वरिष्ठ सुरक्षा आयुक्त अश्रफ के. के. यांनी दिली.मदतकार्य क्रमांक - १५१२,९५९४८९९९९१, ८४२५०९९९९१,नियंत्रण कक्ष, लोहमार्ग मुंबई -०२२-२३७५९२८३/०२२-२३७५९२०१

टॅग्स :रेल्वे