मुंबईतील अंगणवाड्यांचा आता चेहरा मोहरा बदलणार आहे. झोपडपट्टी भागात आता कंटेनर अंगणवाड्या सुरू होणार आहेत. भाजपाचे नेते तसेच मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा (BJP Mangal Prabhat Lodha) यांनी याबाबत माहिती दिली आहे. अंगणवाडी कार्यक्रमात दानशूर व्यक्तींचाही हातभार लागणार आहे. मुंबईतील ४८०० अंगणवाडी दत्तक घेण्यासाठी मुंबईकरांना आवाहन करण्यात आलं होतं.
मंगलप्रभात लोढा यांच्या आवाहनाला दानशूर मुंबईकरांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. आत्तापर्यंत ५०० जणांनी अंगणवाडी दत्तक घेण्याची तयारी दर्शवली आहे. येत्या काळात राज्यभरातील सर्व अंगणवाड्यांचा चेहरा बदलणार असून अंगणवाडी सेविकांपासून ते पालण पोषण, आहार, आरोग्य यावर विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचं लोढा यांनी म्हटलं आहे.
"मुंबईमध्ये ४८५० अंगणवाड्या आहेत. कंटेनर अंगणवाड्या सुरू करू म्हणून आयुक्तांना मी पत्र लिहिलं आहे. यामध्ये मुलांना योग्य ते शिक्षण देण्यात येईल. मुंबईकरांना अंगणवाडी दत्तक घेण्यासाठी आवाहन केलं होतं. अनेक लोक यासाठी पुढे आले आहेत. आणखी काही लोक पुढे येतील अशी अपेक्षा आहे" असं मंगलप्रभात लोढा यांनी म्हटलं आहे.