जिल्हय़ात दूषित जलस्रोत

By admin | Published: November 11, 2014 10:52 PM2014-11-11T22:52:13+5:302014-11-11T22:52:13+5:30

आरोग्य विभागाकडून देण्यात आली असली तरी ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याची नेमकी काय पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे,

Contaminated water bodies in the district | जिल्हय़ात दूषित जलस्रोत

जिल्हय़ात दूषित जलस्रोत

Next
जयंत धुळप - अलिबाग
डेंग्यू, मलेरियासारखे साथरोग जिल्हय़ात वेगाने फैलावत असतानाच, जिल्हय़ातील 1क् तालुक्यांतील 17 प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या हद्दीतील पिण्याच्या पाण्याचे नमुने जलपरीक्षण चाचणीत नापास झाल्याचे निष्पन्न झाल्याने, या सर्व ठिकाणचे जलस्रोत दूषित असल्याचे उघडकीस आले आहे. दूषित जलस्रोत बंद करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली असली तरी ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याची नेमकी काय पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे, याबाबत कोणतीही घोषणा जिल्हा परिषदेकडून करण्यात आलेली नाही.
खालापूर तालुक्यातील 113 पाणी नमुन्यांपैकी 2क्.35 टक्के म्हणजे 23 पाणी नमुने दूषित निष्पन्न झाले आहेत. खालापूर हे तालुक्याचे ठिकाण असून या तालुक्यातील खालापूर याच प्राथमिक आरोग्य केंद्रांत 31 पैकी 17 असे सर्वाधिक दूषित जलनमुने निष्पन्न झाले आहेत. पेण तालुक्यातील 69 नमुन्यांपैकी 18.84 टक्के म्हणजे 13 नमुने दूषित आहेत. पेणमधील गडब प्राथमिक आरोग्य केंद्र क्षेत्रंत 22 पैकी 6 असे सर्वाधिक पाणी नमुने दूषित आहेत. रोहा तालुक्यात 167 नमुन्यांपैकी 11.38 टक्के म्हणजे 19 नमुने दूषित आहेत. रोह्यातील कोकबन प्रा.आ.केंद्र क्षेत्रत सर्वाधिक दूषित पाणी आहे.
पनवेल तालुक्यात 1क्6 पैकी 35 जलनमुने दूषित आहेत. या तालुक्यातील आपटा या प्रा.आ.केंद्र क्षेत्रतील 24 पैकी 12 तर वावंजे प्रा.आ.केंद्र क्षेत्रत  18 पैकी 9 असे 5क् टक्के जलनमुने दूषित निष्पन्न झाले आहेत. गव्हाण प्रा.आ.केंद्र क्षेत्रत 19 पैकी 7 म्हणजे 36.84 टक्के जलनमुने दूषित आहेत. नेरे येथे 12 पैकी 2 तर आजिवली प्रा.आ.केंद्रांत 33 पैकी 5 नमुने दूषित आहेत.
माणगांव तालुक्यात 173 पैकी 31 पाणी नमुने दूषित आहेत. या तालुक्यातील इंदापूर प्रा.आ.केंद्राच्या क्षेत्रतील 29 पैकी 58.62 टक्के म्हणजे 17 नमुने दूषित आहेत. नांदवी या माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या गावात 27.59 टक्के पाणी नमुने दूषित आहेत.
 
अलिबाग तालुक्यात 2क्6 पाणी नमुने तपासण्यात आले. त्यामध्ये 7.77 टक्के म्हणजे 16 नमुने दूषित निष्पन्न झाले. म्हसळा तालुक्यात मुळातच पाणी नमुने संकलन कमी झाले आहे. संकलित झालेल्या 29 नमुन्यात 3 दूषित आहेत. पाली-सुधागडमध्ये 61 पाणी नमुन्यांपैकी 27.87 टक्के म्हणजे 17 नमुने दूषित आहेत. श्रीवर्धन तालुक्यांतील 64 नमुन्यांपैकी 7 नमुने दूषित असून सर्वाधिक दूषित पाण्याचे प्रमाण बोर्ली पंचतन केंद्राच्या क्षेत्रत आहे. मुरुड तालुक्यातील आगरदांडा क्षेत्रतील 17 पैकी चार नमुने दूषित आहेत.
 
5क् टक्के पाणी नमुने दूषित : महाड तालुक्यात 1क्4 पैकी 19.23 टक्के म्हणजे 2क् पाणी नमुने दूषित आहे. दासगांव प्रा.आ.केंद्रे क्षेत्रतील 5क् टक्के पाणी नमुने दूषित निष्पन्न झाले आहेत. चिंभावे मध्ये 33.33 तर वरंधमध्ये 26.67 पाणी नमुने दूषित आहेत. रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी पाचाड गावात 22.22 टक्के पाणी नमुने दूषित आहेत.
 
145 पैकी 53 पाणी नमुने दूषित : कजर्त तालुक्यातील कडाव प्रा.आ.केंद्रे वगळता उर्वरित पाचही प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या क्षेत्रत दूषित पाणी नमुने निष्पन्न झाले आहेत. कजर्तमधील आंबिवली प्रा.आ.केंद्र क्षेत्रतील 34 पैकी तब्बल 73.53 टक्के म्हणजे 25 नमुने दूषित आहेत. खांडसमध्ये 11.11 टक्के, कळंबमध्ये 53.57 टक्के, नेरळमध्ये 37.5क् टक्के पाणी नमुने दूषित आहेत.

 

Web Title: Contaminated water bodies in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.