'रील स्टार्स'ना सरकारी पुरस्कारांची लॉटरी; 'नॅशनल क्रिएटर्स अवॉर्ड'ने होणार सोशल मीडियावरील कंटेंट क्रिएटर्सचा सन्मान

By संजय घावरे | Published: February 14, 2024 08:08 PM2024-02-14T20:08:45+5:302024-02-14T20:09:42+5:30

कंटेंट क्रिएटर्सचा केंद्र सरकार नॅशनल क्रिएटर्स अॅवॅार्ड देऊन गौरव करणार आहे.

content creators on social media will be honored with national creators award | 'रील स्टार्स'ना सरकारी पुरस्कारांची लॉटरी; 'नॅशनल क्रिएटर्स अवॉर्ड'ने होणार सोशल मीडियावरील कंटेंट क्रिएटर्सचा सन्मान

'रील स्टार्स'ना सरकारी पुरस्कारांची लॉटरी; 'नॅशनल क्रिएटर्स अवॉर्ड'ने होणार सोशल मीडियावरील कंटेंट क्रिएटर्सचा सन्मान

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात कंटेंट क्रिएटर्सची संख्या झपाट्याने वाढत आहे. शहरातील गल्लीबोळापासून जिल्ह्यांतील खेड्यापाड्यांपर्यंत बरेच रील स्टार्स लोकप्रिय आहेत. अशा कंटेंट क्रिएटर्सचा केंद्र सरकार नॅशनल क्रिएटर्स अॅवॅार्ड देऊन गौरव करणार आहे.

पूर्वीच्या काळी सिनेमा रीळांवर दाखवला जायचा. रीळांचा जमाना इतिहासजमा झाला असून, रील्सचा जमाना आला आहे. त्यामुळे रील बनवणारे खऱ्या अर्थाने स्टार बनले आहेत. सोशल मीडियावरील कंटेंट क्रिएटर्स अगदी काही सेकंदांच्या रील्स आणि व्हिडीओद्वारे सर्वांचे लक्ष वेधत आहेत. अशा लोकांचा आजवर विविध पुरस्कार सोहळ्यांमध्येही पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येत आहे. यासाठी सरकारनेही पुढाकार घेत नॅशनल कंटेंट क्रिएटर्स अॅवॅार्डची घोषणा केली आहे. सोशल मीडियावरील आमच्या निर्मात्यांसाठी असलेली ही विलक्षण संधी संपूर्ण भारतामध्ये अस्तित्त्वात असलेल्या अविश्वसनीय प्रतिभेचे दर्शन घडवणार असल्याचे एक्सवर लिहित पंतप्रधान मोदींनी नॅशनल क्रिएटर्स अॅवॅार्डची घोषणा केली आहे. समाजातील विविध मुद्दे मांडत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणाऱ्या कंटेंट क्रिएटर्ससाठी ही नामी संधी आहे. त्यांना या पुरस्कारासाठी नॅामिनेशन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या माध्यमातून कंटेंट क्रिएटर्सना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. 

महाराष्ट्रामध्येही बरेच कंटेंट क्रिएटर्स लोकप्रिय आहेत. यात 'स्थळ - पुणे' नावाने रील बनवणाऱ्या अथर्व सुदामेचे सर्वसामान्यांपासून राजकारण्यांपर्यंत सर्वांनीच कौतुक केले आहे. आयुष्मान खुराना, रितेश देशमुख, सोनाली कुलकर्णी, प्रशांत दामले अशा बऱ्याच सेलिब्रिटीजसोबत रील बनवणारा अथर्व नॅशनल कंटेंट क्रिएटर्स अॅवॅार्डबाबत 'लोकमत'शी बोलताना म्हणाला की, आमच्यासारख्या क्रिएटर्सना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने उचललेले हे पाऊल कौतुकास्पद आहे. चित्रपट-नाटकांच्या पुरस्कारांसोबत असाही पुरस्कार देण्यात येत असल्याचा आनंद आहे. रील करणाऱ्या किंवा सोशल मीडियावरील लोकांनाही अॅवॅार्ड दिला जात आहे ही क्रिएटर्सच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून चांगलीच गोष्ट आहे. सहा-सात वर्षांपासून सोशल मीडियावर असून, रील्सचा फॅारमॅट आल्यापासून रील्स बनवू लागलो. माझे १३.५० लाख फॅालोअर्स आहेत. 'मिस्टर सुदामे' ही युट्यूब सिरीजही गाजल्याचे अथर्वने सांगितले. 

२० विभागांमध्ये नॅामिनेशन

यासाठी २० वेगवेगळे विभाग करण्यात आले आहेत. या पुरस्कारासाठी नॅामिनेशन करण्यासाठी २१ फेब्रुवारी ही शेवटची ताऱीख आहे. माय गव्हर्नमेंट ईन या संकेतस्थळावर याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

१० सेकंदांपासून दीड मिनिटांपर्यंत...

रीलचा फॅारमॅट खूप कमी कालावधीचा आहे. त्यामुळे १० सेकंदांपासून जास्तीत जास्त दीड मिनिटांच्या रील्स बनवल्या जातात. दीड मिनिटांपेक्षा मोठ्या रील्सनाही चांगले व्ह्यूज मिळतात, पण कंटेंट तगडा असावा लागतो.

Web Title: content creators on social media will be honored with national creators award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.