विधानसभेच्या २८८ जागा लढवून सभागृहात या! आमदार प्रसाद लाड यांचे मनोज जरांगेंना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2024 06:18 AM2024-07-28T06:18:39+5:302024-07-28T06:19:18+5:30

मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिले ही चूक होती काय?, न्यायालयात आरक्षण टिकवले ही चूक होती काय? असे सवाल प्रसाद लाड यांनी केले आहेत.

contest 288 seats in assembly election bjp mla prasad lad challenge to manoj jarange | विधानसभेच्या २८८ जागा लढवून सभागृहात या! आमदार प्रसाद लाड यांचे मनोज जरांगेंना आव्हान

विधानसभेच्या २८८ जागा लढवून सभागृहात या! आमदार प्रसाद लाड यांचे मनोज जरांगेंना आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : हिंमत असेल तर तुम्ही विधानसभेच्या २८८ जागा लढवा आणि मग मागच्या दाराने, पुढच्या दाराने, छतावरून, छताखालून कुठूनही सभागृहात या. तुम्हाला जेथून यायचेय तेथून या, असे थेट आव्हान प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे-पाटील यांना दिले.

मराठा आरक्षणावरून सध्या जरांगे-पाटील आणि भाजप आमने-सामने आले आहेत. जरांगे यांनी भाजपचे आमदार प्रवीण दरेकर व प्रसाद लाड यांच्यावर टीका करताना  मागच्या दाराने येणारे नेते पक्ष बुडवण्याचे काम करतात, असे म्हटले होते. त्याला प्रत्युत्तर देणारा व्हिडिओ लाड यांनी शनिवारी पोस्ट केला.  त्यात ते म्हणतात, की आम्ही मागच्या दाराने आलो असेन किंवा पुढच्या दाराने आलो असेल. त्याच्याशी तुमचे काय? आमचा नाद करू नका. तुम्ही तुमचे काम करा, आम्हाला आमचे काम करू द्या. 

आरक्षण दिले ही चूक होती काय?

मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिले ही चूक होती काय?, न्यायालयात आरक्षण टिकवले ही चूक होती काय? असे सवालही लाड यांनी केले आहेत.

 

Web Title: contest 288 seats in assembly election bjp mla prasad lad challenge to manoj jarange

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.