Join us

राज्यातील दैनंदिन रुग्णांमध्ये वाढ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 4:07 AM

दिवसभरात आढळले २८ हजार ६९९ नवे काेराेनाबाधितराज्यातील दैनंदिन रुग्णांमध्ये वाढ कायमदिवसभरात आढळले २८ हजार ६९९ नवे काेराेनाबाधित...

दिवसभरात आढळले २८ हजार ६९९ नवे काेराेनाबाधित

राज्यातील दैनंदिन रुग्णांमध्ये वाढ कायम

दिवसभरात आढळले २८ हजार ६९९ नवे काेराेनाबाधित

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा दैनंदिन रुग्णसंख्येतील वाढ कायम राहिली असून दिवसभरात २८ हजार ६९९ रुग्ण आणि १३२ मृत्यूंची नोंद झाली आहे. परिणामी, आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २५ लाख ३३ हजार २६ झाली असून बळींचा आकडा ५३ हजार ५८९ झाला आहे. सध्या राज्यात २ लाख ३० हजार ६४१ रुग्ण उपचाराधीन आहेत.

दिवसभरात १३,१६५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आतापर्यंत एकूण २२,४७,४९५ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८.७३ टक्के झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,८५,८४,४६३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १३.६३ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ११,७७,२६५ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत, तर ११,८८७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. सध्या राज्यातील मृत्युदर २.१२ टक्के आहे.

मुंबईत साडेतीन हजारांहून अधिक रुग्णांची नोंद

मुंबईत ३ हजार ५१२ नवे कोरोनाग्रस्त आढळून आले असून ८ मृत्यू झाले. सध्या एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ३ लाख ६९ हजार ४२६ वर पोहोचला असून आतापर्यंत ११ हजार ६०० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्के असून रुग्ण दुपटीचा कालावधी ९० दिवस इतका आहे. १ हजार २०३ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत ३ लाख २९ हजार २३४ जण कोरोनामुक्त झाले. मुंबईत सध्या २७ हजार ६७२ सक्रिय रुग्ण आहेत. कोरोना रुग्ण आढळून आलेल्या ३८ चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेन्मेंट झोन (प्रतिबंधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर ३६३ इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत ३७ लाख ५४ हजार १०० चाचण्या करण्यात आल्याची पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

........................