Join us

ठेकेदारच झाले कारभारी!

By admin | Published: April 29, 2015 12:24 AM

महापालिका निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये ३६ जण ठेकेदार व बांधकाम साहित्य पुरवठादार आहेत.

नामदेव मोरे - नवी मुुंबईमहापालिका निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये ३६ जण ठेकेदार व बांधकाम साहित्य पुरवठादार आहेत. अनेक नगरसेविकांचे पतीही ठेकेदारच असल्यामुळे पालिका ठेकेदारांच्या हातामध्ये गेली आहे. यावेळी सर्वाधिक ६२ नगरसेविका निवडून आल्या असून त्यामध्ये ३८ गृहिणींचा समावेश आहे. राज्यातील श्रीमंत महानगरपालिकांमध्ये नवी मुंबईचा समावेश होतो. जवळपास २ हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असलेल्या पालिकेमध्ये नगरसेवक होण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांसह ठेकेदारांमध्येही तीव्र स्पर्धा असते. शहरातील बिल्डर, बांधकाम साहित्य पुरवठादार, वाहतूकदार, मनुष्यबळ पुरविणारे ठेकेदार यांचा राजकारणातील वावर वाढू लागला आहे. नगरसेवकपदाचा वापर व्यवसायवृद्धीसाठी होऊ लागला आहे. यावेळीही ५६८ पैकी साठ टक्के उमेदवार व महिला उमेदवारांचे पती ठेकेदार असल्याचे निदर्शनास येत आहे. निवडून आलेल्या १११ नगरसेवकांपैकीही ३६ जण ठेकेदार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेक नगरसेविकांचे पतीही ठेकेदारच आहेत. त्यामुळे यावेळची महापालिका ठेकेदारांच्या हाती गेल्याचे चित्र आहे. फक्त समाजसेवा म्हणून नगरसेवक होणाऱ्यांचे प्रमाण हाताच्या बोटावर मोजण्याएवढे आहे. राजकारण हाच आता अनेकांचा व्यवसाय झाला आहे. निवडणुकीमध्ये लाखो रुपये खर्च करून निवडून यायचे व नगरसेवक झाल्यानंतर पदाच्या बळावर व्यवसायवृद्धी करायची असा अनेकांचा फंडा आहे. यामुळेच अनेक नगरसेवकांची मालमत्ता पाच वर्षांत कित्येक पट वाढल्याचे चित्र दिसते. नगरसेवकांना शासकीय ठेकेदार होता येत नाही, तरीही अनेक नगरसेवकांची मुले, परिवारातील इतर व्यक्ती मात्र ठेकेदारीचा व्यवसाय करत आहेत. साफसफाई, जलकुंभ देखभाल, रस्ते, गटार बांधणीपासून उंदीर मारण्यापर्यंतच्या ठेक्यांमध्ये नगरसेवकांचे नातेवाईक आहेत. पालिकेमध्ये विकासकामांच्या फाइल मूळ ठेकेदाराच्या ऐवजी नगरसेवकांच्या हातामध्ये देऊन अधिकाऱ्यांकडे घेऊन जात असतात. च्नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये यावेळी खऱ्या अर्थाने महिलाराज आले आहे. १११ पैकी ६२ ठिकाणी महिला निवडून आल्या आहेत. अनेक नगरसेविकाही बांधकाम ठेकेदारपासून इतर व्यवसाय करत आहेत. च्३८ गृहिणींनाही नगरसेवक होण्याची संधी मिळाली आहे. आतापर्यंत घराची जबाबदारी सांभाळणाऱ्यांना आता पूर्ण प्रभागाची जबाबदारी सांभाळावी लागणार आहे. च्सर्वपक्षीयांनी तरुणांनाही संधी दिली होती. ऋचा पाटील, कविता आगोंडे, मेघाली राऊत या तीन विद्यार्थिनीही निवडून आल्या आहेत. महापालिकेत साफसफाई, जलकुंभ देखभाल, रस्ते, गटार बांधणीपासून उंदीर मारण्यापर्यंतच्या ठेक्यांमध्ये नगरसेवकांचे नातेवाईक आहेत.नोकरदार व सेवानिवृत्तही सभागृहात महापालिका निवडणुकीमध्ये खासगी क्लासेस चालविणाऱ्या दोन महिला निवडून आल्या आहेत. शंकर मोरे हे माथाडी कामगार सलग दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक जे. डी. सुतारही अद्याप खासगी कंपनीमध्ये नोकरी करत आहेत. काही सेवानिवृत्तही या वेळी निवडून आले आहेत.