कंत्रटी 2,7क्क् कामगारांना कायम करा
By admin | Published: November 25, 2014 12:34 AM2014-11-25T00:34:16+5:302014-11-25T00:34:16+5:30
पालिकेत 2क्क्7 पूर्वीपासून काम करणा:या 2 हजार 7क्क् कंत्रटी सफाई कामगारांना पालिका सेवेत समाविष्ट करून घेण्याचे आदेश औद्योगिक न्यायाधिकरणाने दिले आहेत.
Next
मुंबई : पालिकेत 2क्क्7 पूर्वीपासून काम करणा:या 2 हजार 7क्क् कंत्रटी सफाई कामगारांना पालिका सेवेत समाविष्ट करून घेण्याचे आदेश औद्योगिक न्यायाधिकरणाने दिले आहेत. कचरा वाहतूक श्रमिक
संघाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी देताना न्यायाधिकरणाने हे आदेश दिल्याची माहिती
संघटनेचे सरचिटणीस मिलिंद रानडे यांनी दिली.
सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत रानडे म्हणाले, 13 नोव्हेंबर रोजी न्यायाधिकरणाने दिलेल्या आदेशात स्पष्ट म्हटले आहे, की मुंबई मनपाने अवलंबलेली कंत्रटी पद्धत खोटी व दिखाऊ आहे. मनपा व कामगारांत मालक-कामगार संबंध आहेत. त्यामुळे हे कंत्रटी कामगार नाहीत. परिणामी संबंधित कर्मचा:यांना त्यांच्या भरतीच्या तारखेपासून पालिकेच्या सेवेत समाविष्ट करून घ्यावे. तसेच 24क् दिवसांच्या सेवेनंतर पालिकेचे कायम कामगार म्हणून सर्व फायदे व सवलती द्याव्यात.
या निकालानुसार 2 हजार 7क्क् कर्मचा:यांत पालिकेला प्रत्येकी कामगाराला किमान 5 लाख 5क् हजार रुपये थकबाकी द्यावी लागेल, असा दावा रानडे यांनी केला आहे. परिणामी पालिकेवर 148 कोटी 5क् लाख रुपयांचा बोजा पडणार आहे.
26 नोव्हेंबरला ‘घटनादिनी’ मोर्चा
केंद्र शासनातर्फे कंत्रटी प्रथा नियमन आणि निमरूलन कायदा 197क् या कायद्यात आमूलाग्र बदल केला आहे. त्यामुळे 5क् कामगारांर्पयत ज्या ठेकेदाराकडे कामगार काम करतात, ते या कायद्याच्या कक्षेबाहेर जाणार आहेत.
परिणामी या कायद्याला विरोध करण्यासाठी राज्यातील सुमारे 1क् हजार कंत्रटी सफाई कामगार 26 नोव्हेंबरला राज्यघटना दिनाचे निमित्त साधत राणीबाग ते आझाद मैदान धडक मोर्चा काढणार आहेत. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या कायद्याची अंमलबजावणी येथील राज्यात करू नये, असे आवाहन करण्यात येईल.
ठाणो महानगरपालिकेत मुंब्रा येथील रेतीबंदर परिसरात काम करताना टेम्पोने धडक दिल्याने मंदा तानाजी खांदेकर या कंत्रटी महिला सफाई कामगाराचा मृत्यू झाला. मात्र अद्यापही त्या महिला कर्मचा:याच्या कुटुंबाला कोणतीही मदत मिळालेली नाही. एवढेच काय, तर कर्तव्य बजावताना मृत्यू पावलेल्या या कर्मचा:याच्या मृत्यूची दखल घेण्याची तसदीही पालिका प्रशासन किंवा कंत्रटदाराने घेतली नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे.