Join us

कंत्राटदारांची बिले निघतात गरीबांसाठी पैसा नाही - तावडे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 1:08 AM

केंद्र सरकारने दिव्यांग महिला यांना या संकटकाळात थेट बँक खात्यात पैसे टाकून मदत केली आहे. मात्र राज्य सरकारने बांधकाम मजुरांसारख्या गोरगरीब वर्गाला अजूनही मदत केलेली नाही

मुंबई : जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कंत्राटदारांची कोट्यवधी रुपयांची बिले ३१ मार्चपूर्वी अदा करण्यात आली. त्यासाठी सरकारकडे पैसा होता, पण कोरोनाच्या संकटात गोरगरिबांसाठी पैसा नाही, अशी टीका भाजपचे नेते विनोद तावडे यांनी केली आहे.

केंद्र सरकारने दिव्यांग महिला यांना या संकटकाळात थेट बँक खात्यात पैसे टाकून मदत केली आहे. मात्र राज्य सरकारने बांधकाम मजुरांसारख्या गोरगरीब वर्गाला अजूनही मदत केलेली नाही. केवळ आरोग्य खात्यासाठी तरतूद करून बाकीच्या विभागांना वाऱ्यावर सोडले आहे. पगाराबाबत सरकारने शेवटी जे करायचे तेच केले. आरोग्यसेवेतील तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनाही पगाराचे दोन टप्पे दिले. पहिल्या टप्प्यातील पगार अजून सगळ्यांना मिळाला नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. विदर्भातील बुलडाणा कोरोनाच्या दृष्टीने हॉटस्पॉट बनला आहे पण तिथे चाचणीची सोय नाही. नागपूरला नमुने न्यावे लागतात. त्याऐवजी यवतमाळ, अमरावतीतील वैद्यकीय महाविद्यालयांत ही सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.हे तर सरकारचे अपयशवांद्रे स्टेशनच्या बाहेर स्थानकाबाहेर हजारो लोक जमले पोलिसांनात्याची पूर्वकल्पना नव्हती का गुप्तचर यंत्रणा काय करत होती. पोलिसांच्या अपयशावर काही कारवाई करण्याऐवजी पत्रकारांची मुस्कटदाबी केली जात आहे. मातोश्रीपासून काही अंतरावर हे सगळे घडले हे सरकारचे अपयश असल्याची टीकाही त्यांनी केली.

टॅग्स :विनोद तावडेभाजपाकोरोना वायरस बातम्या