गणेशोत्सवात प्रवाशांच्या गर्दीवर सुरक्षा व्यवस्थेचा कंट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2019 06:03 AM2019-08-17T06:03:08+5:302019-08-17T06:03:22+5:30

मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरील गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाच्यावतीने ‘आॅपरेशन क्यू’ सुरू करणार आहे.

Control of the security system for the crowds at the Ganeshotsav | गणेशोत्सवात प्रवाशांच्या गर्दीवर सुरक्षा व्यवस्थेचा कंट्रोल

गणेशोत्सवात प्रवाशांच्या गर्दीवर सुरक्षा व्यवस्थेचा कंट्रोल

Next

मुंबई : मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरील गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाच्यावतीने ‘आॅपरेशन क्यू’ सुरू करणार आहे. या आॅपरेशनमध्ये प्रवाशांना एका रांगेत मेल, एक्स्प्रेसमध्ये चढण्या-उतरण्याचे आवाहन रेल्वे सुरक्षा बलाकडून केले जाणार आहे.
गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे मध्य आणि कोकण रेल्वे प्रशासनाच्या वतीने या मार्गावरून दरवर्षी विशेष मेल, एक्स्प्रेस सोडल्या जातात. या वर्षीपासून प्रत्येक प्रवाशाला त्याच्या इच्छित गाडीमध्ये बसविण्याचे मार्गदर्शन रेल्वे सुरक्षा बलाच्या वतीने करण्यात येणार आहे.
कलम ३७० रद्द केल्याने संपूर्ण देशातील रेल्वे स्थानकांवरील सुरक्षा व्यवस्थेला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. तेव्हापासून बकरी ईद, स्वातंत्र दिन सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ केली आहे. गणेशोत्सवात गर्दी जास्त असते. त्यामुळे हे लक्षात घेऊन गणेशोत्सवाच्या काळात सुरक्षा व्यवस्थेला आणखी बळकट केले जाणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाच्या वरिष्ठ अधिकाºयाने दिली.

डाव्या बाजूचा वापर करण्याचे आवाहन

प्रत्येक स्थानकावरील पादचारी पूल आणि रेल्वेतून चढताना-उतरताना डाव्या बाजूचा वापर करण्याचे आवाहन रेल्वे सुरक्षा बलाच्यावतीने करण्यात येत आहे. ‘माय लेफ्ट इज माय राइट’ या संकल्पनेची माहिती ‘आॅपरेशन क्यू’ मध्ये दिली जाणार आहे. मेल, एक्स्प्रेसमध्ये चढताना-उतरताना रांगेत उतरल्यास धक्काबुक्की होणार नाही. एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही, याची दक्षता रेल्वे सुरक्षा बलाच्यावतीने घेण्यात येणार आहे.

Web Title: Control of the security system for the crowds at the Ganeshotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.