धारावीत कोरोनाचा प्रसार नियंत्रणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:09 AM2021-08-28T04:09:42+5:302021-08-28T04:09:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : एकीकडे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविण्यात येत असताना धारावीत प्रसार नियंत्रणात आहे. धारावी पॅटर्नमुळे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एकीकडे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविण्यात येत असताना धारावीत प्रसार नियंत्रणात आहे. धारावी पॅटर्नमुळे बाधित रुग्णांचे निदान त्वरित होऊन त्यांच्या नजीकच्या संपर्कातील संशयित रुग्णांचे तत्काळ विलगीकरण केले जात आहे. त्यामुळे आतापर्यंत १५ हून अधिक वेळा धारावीत शून्य बाधित रुग्णांची नोंद झाली आहे.
दाटीवाटीची वस्ती असल्याने धारावीत कोरोनाचा प्रसार झपाट्याने होऊ लागला. मात्र धारावी पॅटर्नने आपला प्रभाव कायम ठेवला आहे. पहिल्या लाटेत जुलै २०२० नंतर या भागामध्ये कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान धारावीतील इमारतींमध्ये रुग्णांची संख्या वाढू लागली. त्यामुळे संसर्ग रोखण्यासाठी पालिकेने पुन्हा एकदा सर्वांची चाचणी सुरू केली. आतापर्यंत येथील ६,५९८ बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
जी उत्तर विभागातील आजची स्थिती...
परिसर... आजचे बाधित... एकूण रुग्ण... सक्रिय... डिस्चार्ज
धारावी... ०..... ७,०१५.... १५...... ६,५९८
दादर.... ०७.... १०,००२... ६०... ९,६५१
माहीम... ०८... १०,३१४... ७२.... ९,९८१