लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ठाण्यातील खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक राजकुमार कोथमिरे व दहशतवादविरोधी पथकातील निरीक्षक दया नायक यांची गुरुवारी तडकाफडकी बदली करण्यात आली. कोथमिरे यांची गडचिरोलीला, तर नायक यांची गोदियाला उचलबांगडी करण्यात आली आहे. पोलीस मुख्यालयातून गुरुवारी त्याबाबतचे आदेश जारी कर करण्यात आले असून त्यांना तातडीने कार्यमुक्त करण्याची सूचना घटकप्रमुखांना करण्यात आल्या आहे.
संजय पांडे यांनी राज्याच्या पोलीस महासंचालक पदाची धुरा सांभाळल्यापासून वादग्रस्त ठरलेले अधिकारी तसेच एकाच ठिकाणी ठिय्या मांडून असलेल्या अधिकाऱ्यांवरही कार्यवाहीचा बडगा उगारला आहे. सोमवारी पाच पोलीस निरीक्षकांची विदर्भ व मराठवाड्यात बदली करण्यात आली होती. कोथमिरे यांच्याबद्दल अनेक तक्रारी गृहमंत्री, पोलीस महासंचालक कार्यालयात करण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्यांची गडचिरोलीला वाचक शाखेत बदली करण्यात आल्याचे समजते. राज्य सरकारच्या रडारवर असलेल्या अप्पर महासंचालक देवेन भारती यांच्या खास मर्जीतील समजल्या जाणाऱ्या दया नायक यांची गोदिया जिल्ह्यात जात पडताळणी प्रमाणपत्र समितीत तडकाफडकी बदली केली आहे. महासंचालकांच्यावतीने अप्पर महासंचालक (आस्थापना) के. के. सरंगल यांनी बदल्यांबाबतचे आदेश जारी केले.
यापूर्वी पाच पाेलीस निरीक्षकांची बदलीnएन्काउंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असलेले पोलीस निरीक्षक दया नायक यांची सात वर्षांत विदर्भात दुसऱ्यांदा बदली झाली आहे. यापूर्वी त्यांनी नागपुरात रुजू होण्यास नकार दिला होता.nयापूर्वी साेमवारी पाच पोलीस निरीक्षकांची विदर्भ व मराठवाड्यात बदली करण्यात आली होती.