वादग्रस्त आयपीएस भाग्यश्री नवटके पदोन्नतीवर जळगावला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 05:09 AM2019-07-16T05:09:57+5:302019-07-16T05:10:12+5:30
गृह विभागाने सोमवारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या केलेल्या बदल्यांमध्ये दलित समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान करणा-या आयपीएस भाग्यश्री नवटके यांचाही समावेश आहे.
मुंबई : गृह विभागाने सोमवारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या केलेल्या बदल्यांमध्ये दलित समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान करणा-या आयपीएस भाग्यश्री नवटके यांचाही समावेश आहे. साहाय्यक अधीक्षक पदावरून त्यांची पदोन्नतीवर जळगावच्या अप्पर अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासह अन्य ४ आयपीएस व ८ राज्य पोलीस सेवेतील (मपोसे) अधिकाऱ्यांना बढती देण्यात आलेली आहे.
बढती झालेल्यांमध्ये नांदेडचे साहाय्यक अधीक्षक नुरुल हसन, रागसुधा आर. व संदीप घुगे यांना अनुक्रमे यवतमाळ, परभणी व नाशिक ग्रामीणला पदोन्नती देण्यात आली आहे. २००७ च्या आयपीएस बॅचचे अधिकारी असलेल्या भाग्यश्री नवटके या गेल्या वर्षी बीड जिल्ह्यात माजलगाव येथे कार्यरत असताना त्यांनी दलित समाजाबद्दल अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते, त्याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रचंड टीकेची झोड उठली होती. त्यामुळे त्यांची सिंधुदुर्गला बदली करण्यात आली. त्यांची विभागीय चौकशी झाली होती.
बदली झालेल्या भापोसे अधिकाºयांची नावे अशी (कंसात कोठून-कोठे) : डॉ. हरिबालाजी एन. (गडचिरोली - अमरावती ग्रामीण), हर्ष पोद्दार (नागपूर - बीड), अमोघ गावकर (रेल्वे नागपूर - अकोला), पंडित कमलाकर (गडचिरोली - नंदूरबार), मंगेश शिंदे (पुणे शहर - गोंदिया), निखिल पिंगळे (वर्धा - गोंदिया), जी. श्रीधर (बीड - एसआरपी, वडसा देसाईगंज), राकेश कलासागर (अकोला - गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे), अरविंद चावरीया (एसआरपीएफ-१ पुणे - एसीबी, औरंगाबाद), सुधीर हिरेमठ (नियोजन व समन्वय, पोलीस मुख्यालय - उपायुक्त-२ पिंपरी-चिंचवड आयुक्तालय), विजय मगर (पीसीआर, नाशिक - सोलापूर शहर), अभिषेक त्रिमुखे (साहाय्यक महानिरीक्षक नियोजन व समन्वय, पोलीस मुख्यालय), निलोत्पल (मालेगाव - नागपूर शहर), प्रशांत होळकर (गुप्तवार्ता विभाग - अमरावती शहर), डॉ. अक्षय शिंदे (नांदेड - एसआरपी-३, जालना), लोहीत मतानी (जळगाव - एसआरपीएफ अमरावती), संदीप दिवाण (एसीबी, ठाणे - आर्थिक गुन्हे शाखा, पुणे).
अप्पर अधीक्षकपदी पदोन्नती झालेले अधिकारी : मनिष कलवानिया (गडचिरोली), अतुल कुलकर्णी (अकोला),
मपोसे अधिकारी : विश्व पी. पानसरे (परभणी - नागपूर रेल्वे), डॉ. संदीप पखाले (नियुक्तीच्या प्रतीक्षेत - सांगली), दत्ता राठोड (नागपूर रेल्वे - नांदेड), प्रदीप चव्हाण (अमरावती शहर - पश्चिम रेल्वे, मुंबई), श्रीकांत परोपकारी (एसीबी, औरंगाबाद - मुंबई), राजकुमार शिंदे (फोर्स वन - ठाणे शहर), संदीप अटोळे (गोंदिया - प्रशिक्षण केंद्र, नानवीज दौंड), विजय खरात (नियंत्रण कक्ष, राज्य मुख्यालय - नाशिक शहर), मीना मकवाना (राज्यपाल, सुरक्षा अधिकारी - मुख्यालय, औरंगाबाद), श्रीकृष्ण कोकाटे (नियुक्तीच्या प्रतीक्षेत - एसआरपीएफ ४ नागपूर), डी.एस. स्वामी (ठाणे शहर - मुंबई), ज्योती क्षीरसागर (आर्थिक गुन्हे शाखा पुणे - प्रशिक्षण केंद्र, तासगाव, सांगली), डॉ. तुषार दोषी (नवी मुंबई - मरोळ प्रशिक्षण केंद्र), रोहिदास पवार (अहमदनगर - प्राचार्य, एसआरपीएफ, पुणे), संजय लाटकर (एसीबी, नांदेड - प्रशिक्षण केंद्र, सोलापूर), शशिकांत बोराटे (सांगली - प्रशिक्षण केंद्र, खंडाळा), स्वाती भोर (उस्मानाबाद - अंबेजोगाई, बीड), अजित बोºहाडे (अंबेजोगाई - एसआयडी, मुंबई), नीलेश अष्टेकर (प्रशिक्षण केंद्र, नानवीज - सीआयडी, पुणे), रश्मी नांदेडकर (भंडारा - एसीबी, नागपूर), संदीप डोईफोडे (बुलडाणा - फोर्स वन), अमरसिंग जाधव (यवतमाळ - अप्पर अधीक्षक, फोर्सवन), डॉ. दिगंबर प्रधान (व्हीआयपी सुरक्षा - महामार्ग सुरक्षा, ठाणे), संदीप पालवे (ठाणे शहर - उस्मानाबाद), संजय बारकुंड (प्रशिक्षण केंद्र तासगाव - मुख्यमंत्री सुरक्षा, एसपीयू), भारत तांगडे (एसआरपी जालना - एसआयडी, मुंबई), कविता नेरकर-पवार (सोलापूर प्रशिक्षण केंद्र - लोहमार्ग, पुणे), तुषार पाटील (पुणे रेल्वे - सिंधुदुर्ग), पुरुषोत्तम कराड (पश्चिम रेल्वे मुंबई - एसआयडी मुंबई), कल्पना बारावकर (सीआयडी, पुणे - एसपीयू मुंबई), रूपाली खैरमोडे -अंबुरे (महामार्ग ठाणे - राज्यपाल सुरक्षा, एसपीयू), नम्रता पाटील (पिंपरी चिंचवड - एसआयडी, सागरी परिक्षेत्र), माधुरी केदार-कांगणे (नाशिक शहर - पीसीआर, नाशिक), नंदकुमार ठाकूर (पोलीस अकादमी, नाशिक - मुंबई), डॉ. दीपाली धाटे (औरंगाबाद शहर - पीसीआर, औरंगाबाद), पौर्णिमा गायकवाड (एसआरपीएफ क्र. ११ - पुणे शहर), स्मिता पाटील (खंडाळा प्रशिक्षण केंद्र - पिंपरी-चिंचवड), शिवराज पाटील (एसपीयू, गुप्तवार्ता), महेश चिमटे (एसआरपी, अमरावती - मुख्य सुरक्षा अधिकारी, विधानमंडळ सचिवालय), स्मार्तना पाटील (पिंपरी चिंचवड - ठाणे शहर).
बढती झालेले उपअधीक्षक/ साहाय्यक अधीक्षक : बजरंग बनसोडे (मुंबई - अप्पर महासंचालक स्टाफ अधिकारी, विशेष कृती), अनिकेत भारती (महामार्ग सुरक्षा पथक, पुणे - भंडारा), रमेश चोपडे (सोलापूर शहर - एसआयडी, नाशिक), नीलेश मोरे (पुणे शहर - वर्धा), जयश्री देसाई (सातारा - पोलीस अकादमी, नाशिक), रजिया बालेखान म्हैसाळे (सातारा - सीआयडी, नागपूर), चंद्रकांत खांडवी (सोलापूर ग्रामीण - पोलीस अकादमी, नाशिक), दीपाली काळे-कांबळे (सोलापूर शहर - अहमदनगर).