कुंठे यांना हायकोर्टाचा दिलासा
By admin | Published: December 13, 2014 02:23 AM2014-12-13T02:23:47+5:302014-12-13T02:23:47+5:30
न्यायालयाने पालिका आयुक्त सीताराम कुंठे व अतिरिक्त आयुक्त राजीव जलोटा यांच्याविरोधात जारी केलेल्या प्रोसेसला उच्च न्यायालयाने शुक्रवारी अंतरिम स्थगिती दिली़
Next
मुंबई : माझगाव येथील बाबू गेणू मंडई, ही महापालिका कर्मचा:यांची इमारत कोसळल्याप्रकरणी भोईवाडा महानगर दंडाधिकारी न्यायालयाने पालिका आयुक्त सीताराम कुंठे व अतिरिक्त आयुक्त राजीव जलोटा यांच्याविरोधात जारी केलेल्या प्रोसेसला उच्च न्यायालयाने शुक्रवारी अंतरिम स्थगिती दिली़
गेल्या वर्षी ही इमारत कोसळली़ मजदूर युनियनचे अध्यक्ष शरद राव यांनी भोईवाडा न्यायालयात याची खासगी तक्रार दाखल केली व यात आयुक्त कुंठे व इतरांवर सदोष मनुष्यवधाचा ठपका ठेवण्याची विनंती केली़ त्याची दखल घेत दंडाधिकारी न्यायालयाने कुंठे यांच्याविरोधात प्रोसेस जारी केल़े याविरोधात कुंठे व जलोटा यांनी ज्येष्ठ विधिज्ञ अनिल साखरे व अॅड़ जोयेल कालरेस यांच्यामार्फत याचिका दाखल केली़
पालिका आयुक्त म्हणून मला विशेष अधिकार आहेत़ पण पालिकेवरचा ताण बघता हे अधिकार विभागीय स्तरावर संबंधित अधिका:यांनाही दिले आहेत़ मुंबईत पालिकेच्या 8 हजार इमारती आहेत़ त्यांचे सव्रेक्षण करण्याचा फतवा 2क्क्9मध्ये जारी केला व यासाठी इमारत देखभाल मुख्य अभियंताची स्वतंत्र समितीही स्थापन केली़ त्यामुळे माझगाव येथील इमारतीच्या सव्रेक्षणाची व त्यापुढील कारवाईची जबाबदारी माझी नव्हती, असा दावा कुंठे यांनी याचिकेत केला़ (प्रतिनिधी)
अॅड़ साखरे यांनी इमारत कोसळण्यात कुंठे यांचा काहीच दोष नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणल़े ते ग्राह्य धरत खंडपीठाने वरील अंतरिम आदेश देत ही सुनावणी तहकूब केली़