महायुतीमध्ये वाद? 'मला आवर घातला जात असेल तर शिरसाट, दरेकरांनाही आवर घाला'; अमोल मिटकरींची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 12:58 PM2024-06-26T12:58:18+5:302024-06-26T13:02:52+5:30

Amol Mitkari : महायुतीमधील नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे दिसत आहे. अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी आता पुन्हा प्रवीण दरेकर आणि संजय शिरसाट यांच्यावर टीका केली.

Controversy in the Mahayuti? Accusations are going on between Amol Mitkari and pravin darekar | महायुतीमध्ये वाद? 'मला आवर घातला जात असेल तर शिरसाट, दरेकरांनाही आवर घाला'; अमोल मिटकरींची मागणी

महायुतीमध्ये वाद? 'मला आवर घातला जात असेल तर शिरसाट, दरेकरांनाही आवर घाला'; अमोल मिटकरींची मागणी

 Amol Mitkari ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर महायुतीमधील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे दिसत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रावादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपाच्या चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली होती, या टीकेला प्रत्युत्तर देत प्रवीण दरेकर यांनी मिटकरी यांच्या तोंडाला आवर घालण्याची गरज असल्याचे म्हटले होते. दरम्यान, आता महायुतीतील नेत्यांमध्ये पुन्हा आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुका महायुती एकत्रित लढणार की नाही या चर्चा सुरू झाल्या आहेत. 

भाजपा खासदार ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी निवड, आवाजी मतदानानंतर विजयी घोषित

काही दिवसापूर्वी लोकसभा निकालाबाबत एका मॅक्झिनमध्ये राज्यात भाजपाला अपयश हे राष्ट्रवादी मिळाले असल्याचा दावा करण्यात आला होता. या दाव्यावर बोलताना आमदार अमोल मिटकरी यांनी महायुतीत दादांचा खच्चीकरण सुरू असल्याचं विधान केले होते. तसेच भाजपा नेते चंद्रकात पाटील यांच्यावरही टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना प्रवीण दरेकर म्हणाले, अमोल मिटकरी यांनी तोंडाला आवर घालण्याची गरज आहे. पक्षाने पाहावे, त्यांना काय अधिकार आहे. त्यांची बाष्पळ बडबड असते. मागच्या एका प्रकरणात त्यांना प्रदेशाध्यक्ष यांनी समज दिली होती. महायुतीत तडा जाणार नाही, असे वक्तव्य त्यांनी करू नये. आपण बोलून जाता ते महायुतीला हानिकारक आहे, प्रदेशाध्यक्ष यांनी त्यांना हानिकारक असल्याचे सांगावे, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. 

आता प्रवीण दरेकर यांच्या टीकेला आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. "मिटकरींनी बोलताना पक्षश्रेष्ठींशी बोललं पाहिजे, असं काहीजण म्हणतात. ऑगर्नाझरमधून आमच्या नेत्यांवर टीका झाली. या टीकेनंतर आमच्या नेत्यांवर कोणी काही टीका केली तर आम्ही काही शांत बसणार नाही. पण, महायुतीमध्ये जर राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांना आवर घाला असं बोलत असतील तर महायुतीमधील दोन्हीकडून शिवसेनेतील संजय शिरसाट, किंवा भाजपामधील प्रवीण दरेकर त्यांच्यावर त्या त्या पक्षाने लगाम घातला पाहिजे', असं विधान आमदार अमोल मिटकरी यांनी केले आहे. या विधानामुळे आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत. 

प्रवीण दरेकर काय म्हणाले?

"मला वाटतं मी परवाही म्हटलो आहे की, अमोल मिटकरी यांच्या तोंडाला लगाम घालण्याची आवश्यक्ता आहे. कारण अमोल मिटकरी यांना अधिकार दिला आहे का? ते ऑथोराईज आहेत का? हे प्रदेशाध्यक्ष आणि अध्यक्षांनी सांगावं. जेणेकरुन त्यांनी घेतलेली भूमिका अधिकृत आहे असं समजू. त्यांचे अध्यक्ष किंवा प्रदेशाध्यक्ष हे जेव्हा भूमिका मांडतील तेव्हा या भूमिकेला महत्व येईल, असंही प्रवीण दरेकर म्हणाले. 

Web Title: Controversy in the Mahayuti? Accusations are going on between Amol Mitkari and pravin darekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.