मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिकात्मक बकरी ईद साजरी करण्याच्या ठाकरे सरकारच्या सूचनांवर काँग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. माजी मंत्री नसीम खान यांनी राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात आवाज उचलत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. प्रतिकात्मक बकरी ईद साजरी करण्याला काँग्रेस नेत्यांनी विरोध केला आहे.
नसीम खान यांनी पत्रात लिहिलं आहे की, सरकारने योग्य त्या सुरक्षेची खबरदारी घेत बकरी ईद साजरी करण्याची परवानगी दिली पाहिजे, प्रतिकात्मक बकरी ईद साजरी केली जाऊ शकत नाही, सरकारच्या या निर्णयामुळे मुस्लीम नेते, धर्मगुरु आणि समुदाय प्रचंड नाराज झालेला आहे. ऑनलाईन बकेरी खरेदी करण्याची सूचना सरकारने केली पण त्यासाठी व्यवस्था केली नाही. ऑनलाईन बकरी खरेदी कुठून करायची? याची माहिती नाही. बकरी खरेदी करताना त्याचे वजन पाहिले जाते, त्यानंतर कुर्बानी दिली जाते. इंटरनेटवर बकरीचे फोटो पाहून कुर्बानीसाठी बकरी खरेदी करु शकत नाही असं त्यांनी सांगितले आहे.
तसेच जर सरकार सोशल डिस्टेंसिंगचं आणि अन्य नियमांचे पालन करुन गणेशोत्सव साजरी करण्याची परवानगी देते तर त्याच नियमांनी बकरी ईद साजरी करण्याची परवानगी द्यावी. इस्माममध्ये प्रतिकात्मक कुर्बानी देण्याची मान्यता नाही, पण आम्ही प्रतिकात्मक बकरी ईद कशी साजरी करणार? सरकारने घेतलेला निर्णय तातडीनं बदलण्यात यावा. मुख्यमंत्र्यांसमोर माहिती न ठेवल्याने अशाप्रकारे तुघलकी निर्णय घेतला गेला असं सांगत नसीम खान यांनी पक्षाला आणि राज्य सरकारला दोषी ठरवलं आहे.
तर एमआयएमचे खासदार एम्तियाज जलील यांनी सांगितले की, प्रत्येक उत्सावाचं एक महत्त्व असतं. बकरी ईद कुर्बानीची परंपरा आहे, ती आम्ही साजरी करणारच. हा उत्सव साजरा करण्याच्या आमचा निर्धार पक्का आहे. सरकारला जर यावर काही तोडगा काढायचा असेल तर त्यांनी चर्चा करावी असं ते म्हणाले. तर या प्रकरणात शरद पवारांची भेट घेऊन त्यांना ही समस्या सांगण्यात येणार असल्याचं समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख म्हणाले. तसेच गणपती उत्सव प्रतिकात्मक साजरा करु शकत नाही मग मुस्लिमांना प्रतिकात्मक बकरी ईद साजरी करण्याचं का सांगितलं जातंय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
कृपया 'त्या' आकड्यांकडे लक्ष देऊ नका; उद्धव ठाकरेंनी सांगितलं कोरोनाचं 'अंकगणित'
...म्हणून डोक्यावरचे केस गेलेले दिसताहेत; उद्धव ठाकरेंनी सांगितलं खरं कारण
मी घरात बसून सगळीकडे जातोय, अख्खं राज्य कव्हर करतोय; उद्धव ठाकरेंनी विरोधकांना सुनावलं
Fact Check: मुलीच्या ऑनलाईन शिक्षणासाठी वडिलांनी गाय विकून मोबाईल खरेदी केला? या बातमीमागचं सत्य उघड