बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी शिवसैनिकांना सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 05:23 AM2017-11-07T05:23:11+5:302017-11-07T05:23:24+5:30

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त महापालिकेतर्फे दादर येथील शिवाजी पार्कवर येणाºया लोकांना सुविधा पुरविण्यात येणार आहेत.

 Convenience of Balasaheb Sena's Shiv Sainiks | बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी शिवसैनिकांना सुविधा

बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी शिवसैनिकांना सुविधा

googlenewsNext

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त महापालिकेतर्फे दादर येथील शिवाजी पार्कवर येणाºया लोकांना सुविधा पुरविण्यात येणार आहेत. यासाठी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पुढच्या वर्षापासून ही तरतूद दरवर्षी अर्थसंकल्पात करण्यात येणार आहे. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या दालनात झालेल्या बैठकीत हा निर्णय सोमवारी घेण्यात आला.
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी १७ नोव्हेंबर रोजी त्यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी, राज्यातून शिवसैनिक मोठ्या संख्येने शिवाजी पार्क येथे येत असतात. या शिवसैनिकांना आतापर्यंत शिवसेना सोईसुविधा पुरवित होती. मात्र, यापुढे हा खर्च पालिका करणार आहे. यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येणार आहे.
याबाबत माहिती देताना सभागृह नेते यशवंत जाधव यांनी सांगितले की, शिवसेना सुविधा पुरवित आहेच, पण दरवर्षी अभिवादन करण्यासाठी येणाºयांची संख्या वाढत आहे. त्यांच्यासाठी पालिकेमार्फत सुविधा पुरविल्या जाव्यात, म्हणून ही मागणी करण्यात आली होती. त्या मागणीला प्रशासनाने मंजुरी दिल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title:  Convenience of Balasaheb Sena's Shiv Sainiks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.