प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे स्थानकात ‘सुविधा फलक’

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 06:45 AM2018-07-13T06:45:33+5:302018-07-13T06:46:39+5:30

मुंबईची विशेषत: रेल्वे स्थानकाची माहिती नसलेल्या प्रवाशांना स्थानकातील उपलब्ध सुविधांची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी पश्चिम रेल्वेने प्रमुख रेल्वे स्थानकांत सुविधा फलक बसवण्याचा निर्णय घेतला आहे.

For the convenience of travelers, 'convenience panel' at railway station | प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे स्थानकात ‘सुविधा फलक’

प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे स्थानकात ‘सुविधा फलक’

Next

मुंबई - मुंबईची विशेषत: रेल्वे स्थानकाची माहिती नसलेल्या प्रवाशांना स्थानकातील उपलब्ध सुविधांची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी पश्चिम रेल्वेने प्रमुख रेल्वे स्थानकांत सुविधा फलक बसवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकात सुविधा फलक नुकतेच उभाराले आहेत.

मुंबईतील बहुतांशी स्थानकांवर दिशादर्शक फलक अथवा स्थानकातील सुविधांबाबत योग्य माहिती देणारे फलक नाहीत. यामुळे पर्यटक, सामान्य मुंबईकरांसह मेल-एक्स्प्रेसमधील नवीन प्रवासी आणि विदेशी पर्यटक गोंधळून जातात. आजदेखील चर्चगेट, मुंबई सेंट्रलसारख्या प्रमुख स्थानकांवर उपनगरीय आणि मेल-एक्स्प्रेस फलाटाचे क्रमांक नीट न समजल्याने प्रवासी काही मिनिटे गोंधळून जातात. शिवाय गेल्या अनेक वर्षांपासून सरकते जिने, पादचारी पूल नव्याने उभारण्यात आले आहेत. याची माहिती प्रवाशांना देण्यासाठी पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ए.के. गुप्ता यांनी सुविधा फलक हा प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकात सुविधा फलक उभारण्यात आले असून सर्व प्रमुख स्थानकांवर एकूण ६० पेक्षा जास्त सुविधा फलक उभारण्यात येतील. यात दादर, अंधेरी, बोरीवली, कांदिवलीसह अन्य स्थानकांचा समावेश असल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितले. तर या फलकांची योग्य काळजी घेतली आणि फलक वारंवार स्वच्छ ठेवले तरच त्यातील माहिती प्रवाशांना समजून घेता येईल, अशी प्रतिक्रिया प्रवासी संघटनांनी दिली.

कोणती माहिती मिळेल?
स्थानकातील फलाटांची संख्या, स्टेशन व्यवस्थापक कार्यालय, उपनगरीय तिकीट बुकिंग कार्यालय, शौचालय, स्वच्छतागृह, एटीएम, लिफ्ट, विश्रांतीगृह, आरक्षण केंद्र, मेल-एक्स्प्रेस आरक्षण केंद्र, खाद्यपदार्थ विक्री केंद्र आदींची माहिती फलकाद्वारे मिळेल.

कुठे उभारणार फलक?
स्थानकात प्रवेश करताना दर्शनी भागात असे फलक उभारण्यात आले आहेत.

Web Title: For the convenience of travelers, 'convenience panel' at railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई