Join us

ऑनलाइन शिक्षण सोयीचे; ५४ टक्के विद्यार्थ्यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 4:06 AM

काेराेना काळातील सुरक्षित पर्यायलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सुमारे ५४ टक्के भारतीय विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण पद्धती सोयीस्कर ...

काेराेना काळातील सुरक्षित पर्याय

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सुमारे ५४ टक्के भारतीय विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण पद्धती सोयीस्कर वाटत असल्याचे नव्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

भारतातील शिक्षण आणि शिकण्याची पद्धती कशी बदलत गेली हे समजून घेण्यासाठी ब्रेनली या ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्मने ‘लॉकडाउन अँड लर्न-फ्रॉम-होम मॉडेल’ शीर्षकाअंतर्गत हे नवीन सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात दोन हजार ३७१ विद्यार्थी सहभागी झाले होते. सर्वेक्षणातील सुमारे ५४ टक्के विद्यार्थ्यांनी ऑनलाइन शिक्षण पद्धती सोयीस्कर, सुरक्षित असल्याचे सांगितले.

सर्वेक्षणातील निम्म्यापेक्षा जास्त सहभागींनी संमिश्र शिक्षण पद्धतीला पसंती दिली. गेल्या वर्षी ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्मच्या साह्याने विद्यार्थ्यांना शिकण्यास मदत झाली. काेरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ झाल्याने सध्या पुन्हा शाळेत जाण्यास विद्यार्थ्यांना भीती वाटत आहे. या सर्वेक्षणात बहुतांश विद्यार्थ्यांनी मागील वर्ष कसे गेले, हे सांगितले तसेच धोरणात्मक उपाययोजना आणि इतर संबंधित मुद्द्यांवर मते मांडली. शिक्षणात मोठ्या प्रमाणावर बदल झाल्यामुळे शैक्षणिक कामगिरीवर, अभ्यासावर संमिश्र परिणाम झाल्याचे मत अनेक विद्यार्थ्यांनी नोंदविले.

* ऑनलाइन परीक्षांचे आव्हान कठीण

मागील वर्षी परीक्षा ही अडचणीची व मानसिक त्रासाची ठरल्याचे मत विद्यार्थ्यांनी मांडले. ऑनलाइन परीक्षा अधिक आव्हानात्मक असल्याचे नमूद केले. ऑनलाइन परीक्षासाठी अधिक सोप्या पद्धतींचा वापर करायला हवा, अशी मते त्यांनी मांडले.

* संमिश्र शिक्षण पद्धतीचा पर्याय

ब्रेनीचे मुख्य कार्यक्रम अधिकारी राजेश बिसाणी यांनी सांगितले की, साधारण ५४ टक्के विद्यार्थ्यांनी सद्य:स्थितीत ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवण्यास पसंती दर्शवली. शिक्षणाच्या इतिहासात यापूर्वी ऑनलाइन लर्निंग चॅनलचा एवढ्या मोठ्या प्रमाणावर जागतिक स्तरावर कधीच वापर झाला नव्हता. आता बहुतांश विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना शिक्षणासाठीची ऑनलाइन साधने कशी वापरायची ते समजले आहे. त्यामुळे संमिश्र शिक्षण पद्धती ही या क्षेत्राच्या प्रगतीचा मार्ग असेल.

............................................