अतिक्रमणावर सोयीचे राजकारण

By admin | Published: July 20, 2015 02:31 AM2015-07-20T02:31:03+5:302015-07-20T02:31:03+5:30

बेकायदा फेरीवाल्यांचे समर्थन करणाऱ्या काँग्रेसविरोधात गेल्या आठवड्यात शिवसेना-भाजपा युतीने बंडाचा झेंडा फडकविला होता़ आज त्याच सत्ताधाऱ्यांची

Convenient politics on encroachment | अतिक्रमणावर सोयीचे राजकारण

अतिक्रमणावर सोयीचे राजकारण

Next

पालिका डायरी शेफाली परब-पंडित
बेकायदा फेरीवाल्यांचे समर्थन करणाऱ्या काँग्रेसविरोधात गेल्या आठवड्यात शिवसेना-भाजपा युतीने बंडाचा झेंडा फडकविला होता़ आज त्याच सत्ताधाऱ्यांची भूमिका बेकायदा खुल्या व्यायामशाळेसाठी बदलली आहे़ राजकीय पक्षांच्या या सोयीच्या राजकारणानेच अतिक्रमणमुक्त मुंबईच्या स्वप्नाला सुरुंग लावला आहे़
फुकटात काहीही मिळणे मुश्कील़ अशा या शहरात अभिनेता दिनो मोरियाला कुठून शहाणपण सुचले आणि मुंबईकरांसाठी त्याने खुल्या व्यायामशाळेची संकल्पना आणली़ पदपथावर असलेल्या व्यायाशाळेत येणारा-जाणारा वाटसरू काही क्षण कसरत करू शकतो़ धकाधकीच्या जीवनात व्यस्त असलेल्या मुंबईकरांना आपल्या प्रकृतीसाठी व्यायाम करण्याची संधी मिळावी, या उद्देशाने ही व्यायामशाळा बसविण्यात येत असल्याचा मोरियाचा दावा आहे़
या खुल्या व्यायामशाळेमुळे मुंबईकरांची नव्हे, तर राजकीय कसरतीला आमंत्रण दिले आहे़ नाइटलाइफ, गच्चीवरील रेस्टॉरंटची स्वप्नं मुंबईला दाखविणाऱ्या युवराजांच्या हस्तेच या व्यायामशाळेचे उद्घाटन झाले होते़ तीच व्यायामशाळा दुसऱ्या दिवशी बेकायदा ठरवित उचलण्याचे धाडस सी विभागाने दाखविले़ नाचक्की करणाऱ्या या घटनेमुळे शिवसेनेचे शिलेदार खवळले आणि पहिल्यांदाच कारवाईची तत्परता दाखविणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मागे लागले़
तरीही या व्यायामशाळेला सी विभाग कार्यालयाची परवानगी नव्हती, या भूमिकेवर ठाम राहत साहाय्यक आयुक्त संगीता हसनाळे यांनी साहसच दाखविले आहे़ त्यांच्या स्पष्टोक्तीमुळे हा बेकायदा व्यवहार उजेडात आला आहे़ काही दिवसांपूर्वी फेरीवाल्यांची कड घेऊन आलेले काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी पालिकेच्या कारवाईला
फेरीवाले आपल्या स्टाईलने उत्तर देतील, असा इशारा दिला होता़ त्यावेळी सत्ताधाऱ्यांनी रान उठविले होते़
निरुपम यांच्या भूमिकेचे समर्थन होऊच शकत नाही़ मात्र बेकायदा फेरीवाल्यांना विरोध करणाऱ्या शिवसेनेला आपल्या याच भूमिकेचा आता विसर पडला आहे़ सोयीनुसार बदलणारी ही भूमिकाच फसवी असल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही़ खुल्या व्यायामशाळेला तत्कालीन आयुक्त सीताराम कुंटे, मुंबई पुरातन वास्तू समितीनेही परवानगी नाकारली होती़ पुरातन परिसरातच असलेल्या या व्यायामशाळेला स्थानिकांचाही विरोध होता़
पदपथावर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांनी पादचाऱ्यांवर अन्यायच केला आहे़ मग अशा व्यायामशाळा व बांधकामांना केवळ विनामूल्य उपलब्ध असल्यामुळे परवानगी द्यावी का? मुंबई अतिक्रमण आणि होर्डिंग्जमुक्त करण्याचे स्वप्न गेल्या तीन वर्षांपूर्वी मुंबईकरांना पडले होते़ तसा दावाच तत्कालीन आयुक्त सीताराम कुंटे यांनी अर्थसंकल्पातून केला
होता़ अनेक वेळा न्यायालयानेही फटकारले़ परंतु सोयीचे राजकारण जोपर्यंत चालेल, तोपर्यंत मुंबई अतिक्रमणाच्या श्रापातून मुक्त होऊ शकत नाही़

Web Title: Convenient politics on encroachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.