Join us

लेखक-प्रकाशकांचे पुस्तकांच्या गावात संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2018 6:02 AM

महाबळेश्वर येथील भिलार या गावी ८ आणि ९ डिसेंबर रोजी अभिनव लेखक-प्रकाशक संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाचे उद्घाटन सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते होणार आहे.

मुंबई : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, महाराष्ट्र साहित्य परिषद आणि अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पुस्तकांच्या गावात’ या शीर्षकाने महाबळेश्वर येथील भिलार या गावी ८ आणि ९ डिसेंबर रोजी अभिनव लेखक-प्रकाशक संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाचे उद्घाटन सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते होणार आहे.डॉ. आशुतोष जावडेकर, डॉ. सदानंद बोरसे, डॉ. उमा कुलकर्णी, डॉ. रमेश धोंगडे, माजी संमनेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस , साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड यांसारख्या दिग्गजांच्या उपस्थितीत विविध चर्चासंत्राच्या व कार्यक्रमांची रेलचेल या संमेलनात असेल. ‘प्रतिभासंपन्न मायलेकी’ या कार्यक्रमात वीणा देव, मृणाल देव-कुलकर्णी हे संवाद साधतील.त्याचप्रमाणे ग.दि. माडगूळकर, पु.ल.देशपांडे आणि सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘स्मरण प्रतिभावंतांचे’ हा दृक्श्राव्य कार्यक्रम हे संमेलनाचे विशेष आकर्षण असेल. तर दुसऱ्या दिवशी ९ डिसेंबर रोजी ‘साहित्य विश्वातील सद्यस्थिती’ या विषयावर डॉ. श्रीपाल सबनीसयांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होईल.वाचन संस्कृती वाढविण्यासाठी ‘लेखक- प्रकाशक सहभाग’ हा परिसंवाद लक्ष्मीकांत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.