विकास आराखड्यात धर्मस्थळांवर संक्रांत
By admin | Published: April 5, 2015 02:27 AM2015-04-05T02:27:31+5:302015-04-05T02:27:31+5:30
मुंबईच्या विकास आराखड्यावरुन राजकारण तापले असतानाच मुंबईचे ग्रामदैवत महालक्ष्मी मंदिर आणि परिसराची जागा ‘ओपन स्पेस’ म्हणून दाखवण्यात आली आहे़
महालक्ष्मी मंदिराला दाखवली ओपन स्पेस !
हाजी अलीच्या जागेवर निवासी संकुल
मुख्यमंत्र्यांकडून लक्ष घालण्याचे आश्वासन
मनोहर कुंभेजकर - मुंबई
मुंबईच्या विकास आराखड्यावरुन राजकारण तापले असतानाच मुंबईचे ग्रामदैवत महालक्ष्मी मंदिर आणि परिसराची जागा ‘ओपन स्पेस’ म्हणून दाखवण्यात आली आहे़ हाजी अलीच्या जागेवर निवासी तसेच व्यापारी संकूल तर जहांगीर आर्ट गॅलरी व मॅक्समुलर भवनची जागा पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी म्हणून आरक्षित केल्याची धक्कादायक माहिती वॉच डॉग फाऊन्डेशनचे अॅड. गॉडफ्रे पिमेंटा यांनी उजेडात आणली आहे. त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच ईमेलद्वारे ही माहिती कळवली असून, मुख्यमंत्र्यांनीही दखल घेत जातीने लक्ष घालणार असल्याचे आश्वासन दिले आहे़
आराखड्याचे धार्मिक व सांस्कृतिक जागांवरील अतिक्रमण मुंबईकरांच्या श्रद्धा व भावनांवरच केलेला हल्ला असल्याची भावना अॅड. पिमेंटो यांनी व्यक्त केली. पालिकेने तयार केलेल्या नव्या आराखड्यात अनेक प्रसिद्ध धार्मिक स्थळे आणि हेरिटेज वास्तंूवर आरक्षण दाखविण्यात आल्याने सर्व जातीधर्माच्या नागरिकांच्या भावना दुखावल्याचा आरोप पिमेंटो यांनी केला. आराखडा तयार करणाऱ्या पालिकेच्या अधिकारी आणि नियोजनकारांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
सिद्धिविनायक मंदिर या आरक्षणातून वाचले असले तरी मंदिरालगतच्या क्रीडांगणावर मेट्रो तीनच्या स्थानकाचे आरक्षण दाखवले आहे. तर वाळकेश्वर येथील बाणगंगा मंदिरालगत असलेला पुरातन धोबीघाटच्या दोन जागांवर महापालिका रुग्णालय/आरोग्य केंद्र नियोजित केले आहे.
च्प्रसिद्ध जहांगीर आर्ट गॅलरी आणि काळाघोडा येथील बॉम्बे हिस्टरी नॅचरल सोसायटीची जागी पशुवैद्यकीय रुग्णालयासाठी, रिगल सिनेमासमोरील प्रसिद्ध म्युझियम क्रीडांगणासाठी आरक्षण दाखविले आहे.
च्सेंट थॉमस कॅथेड्रल, हॉर्निमन सर्कल येथील जागेवर व्यापारी तसेच संकुलासाठी आरक्षित दाखवण्यात आले आहे.
च्माऊंट मेरी चर्च आणि जुहूच्या
इस्कॉन मंदिराच्या जागेवर निवासी तसेच व्यापारी संकुलाचे आरक्षण दाखवण्यात आले आहे.
चर्चच्या
जागी सभागृह
काळाघोडा येथील सेंट अॅण्ड्यूज चर्चच्या जागी नागरिकांसाठी सभागृह तर अंधेरी (पूर्व) चकला येथील होली फॅमिली चर्च व रुग्णालय औद्योगिक वापरासाठी राखून ठेवले आहे. कुलाबा येथील अफगाण चर्च लगतच्या जागेवर सिव्हरेज पंपिंग स्टेशनसाठी आरक्षण दाखवले आहे. असा हा अचंबित करणारा विकास आराखडा अरबी समुद्रात बुडवण्याची मागणी अॅड. ग्रॉडफ्रे पिमेंटा यांनी केली आहे.