Join us

कर्नाटक मॉडेलच्या धर्तीवर  बेस्टच्या जुन्या बसेचे मोबाईल फिव्हर क्लिनिक मध्ये रूपांतर करा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 4:55 PM

आज कोरोनाच्या महामारीत आप्तकालीन सेवेतील नागरिकांना रस्त्यावर धावणाऱ्या १० टक्के बेस्टच्या बसेस या आधारवड ठरत आहेत.

मनोहर कुंभेजकर

मुंबई : आज कोरोनाच्या महामारीत आप्तकालीन सेवेतील नागरिकांना रस्त्यावर धावणाऱ्या १० टक्के बेस्टच्या बसेस या आधारवड ठरत आहेत.बेस्टकडे जुन्या बसेस उपलब्ध असून आता कर्नाटक मॉडेलच्या धर्तीवर बेस्ट बसेचे मोबाईल फिव्हर  क्लिनिक मध्ये रूपांतर करण्याची आग्रही मागणी उत्तर मुंबई भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांनी बेस्ट प्रशासनाकडे केली आहे.

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून महापालिकेला रुग्णांना क्वारंटाइन करण्यासाठी जागेची टंचाई होऊ शकते.त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कर्नाटक सरकारने त्यांच्या जुन्या परिवहन बसेसचे मोबाईल फिव्हर क्लिनिक मध्ये रूपांतर करून सदर बसेस या सेवाभावी संस्थांना तात्पुरत्या स्वरूपात चालवण्यास दिल्या आहेत.त्यामुळे कर्नाटक मॉडेलची मुंबईत त्वरित अंमलबजावणी करून बेस्टच्या जुन्या बसेसचे फिव्हर क्लिनिक मध्ये रुपांतर करून त्या तात्पुरत्या स्वरूपात सेवाभावी संस्थाना चालवण्यास देण्यात याव्यात अशी आग्रही मागणी खासदार गोपाळ शेट्टी यांनी बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांच्याकडे केली आहे.जेणेकरून बेस्ट प्रशासनाला देखिल उत्पन्न मिळेल आणि नागरिकांची फिव्हर तपासणी करून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल अशी स्पष्ट भूमिका खासदार शेट्टी यांनी लोकमतशी बोलतांना व्यक्त केली. बसेसचे मोबाईल फिव्हर क्लिनिकमध्ये रूपांतर करण्यासाठी कर्नाटक सरकारला  ५०००० रुपये खर्च आला आहे.या क्लिनिकमध्ये रुग्णांसाठी बेड,डॉक्टरला केबिन,वैद्यकीय बॉक्स,वॉश बेसिन आदी सुविधा असतील अशी माहिती त्यांनी दिली.अश्या प्रकारचे मॉडेल हे मुंबईकरांसाठी मोठा दिलासा ठरेल असे मत त्यांनी व्यक्त केले.

------------------------------

पोयसर जिमखाना बेस्टच्या जुन्या बसेस घेण्यास सज्ज  : बेस्टच्या जुन्या बसेसचे मोबाईल कोरोना फिव्हर किल्निक मध्ये रूपांतर करून सदर बसेस घेण्यास कांदिवली पश्चिम येथील पोयसर जिमखाना सज्ज आहे.तरी सदर प्रस्ताव आपण बेस्टच्या महाव्यवस्थापकांकडे सादर करावा अशी मागणी पोयसर जिमखान्याचे मुकेश भंडारी यांनी खासदार शेट्टी यांच्याकडे केली असल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले.------------------------------

टॅग्स :कोरोना सकारात्मक बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्या