Join us

महावितरणकडून २३७ गणेशोत्सव मंडळांना सवलतीच्या दरात वीज जोडणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2018 4:47 AM

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर २३७ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना तात्पुरती विजेची जोडणी देण्यात आल्याची माहिती महावितरणने दिली.

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर २३७ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना तात्पुरती विजेची जोडणी देण्यात आल्याची माहिती महावितरणने दिली. महावितरणकडे तात्पुरत्या वीज जोडणीसाठी ठाणे सर्कलमधून ३८२ मंडळांचे अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी २३७ मंडळांना तात्पुरती विजेची जोडणी दिली आहे. दरम्यान, सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांना वीजपुरवठ्यासाठी महावितरणने सवलतीच्या वीजदरासह एकच स्लॅब ठेवल्याने या मंडळांनी वापरलेल्या शेवटच्या युनिटलाही वहन आकारासह केवळ ४ रुपये ३८ पैसे प्रतियुनिट दर आकारण्यात येईल.सर्वधर्मीयांच्या सार्वजनिक उत्सवांच्या तात्पुरत्या वीजजोडणीसाठी प्रतियुनिट ३ रुपये २० पैसे अस्थिर आकार आणि १ रुपया १८ पैसे वहन (व्हिलिंग) आकार असा एकूण ४ रुपये ३८ पैसे प्रतियुनिट सध्याचा दर आहे. याउलट घरगुती व वाणिज्यिक किंवा इतर वर्गवारीमध्ये वीजवापराच्या स्लॅबनुसार वेगवेगळे वीजदर निश्चित आहेत. मात्र सर्वधर्मीयांच्या सार्वजनिक उत्सवांसाठी घेतलेल्या वीजजोडणीद्वारे वीजवापरासाठी केवळ एकच वीजदर आकारण्यात येत आहे. कितीही वीज वापरल्यास शेवटच्या युनिटपर्यंत केवळ ४ रुपये ३८ पैसे दर आकारण्यात येतील. या तुलनेत घरगुती व वाणिज्यिक वर्गवारीचा वीजदर स्लॅबनुसार दुप्पट व तिपटीने अधिक आहे.विभाग दाखल अर्ज मंजुरीठाणे-१ ६५ ४५ठाणे-२ ५१ १८ठाणे-३ ११ १०वागळे इस्टेट ५४ ३०मुलुंड १०९ ८३भांडुप ९२ ५१एकूण ३८२ २३७टोल फ्री क्रमांक १९१२,१८००१०२३४३५, १८००२३३३४३५

टॅग्स :गणेश चतुर्थी २०१८गणेशोत्सव