अवजड वाहन प्रवेशबंदी; उद्या वाहतूकदारांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 05:32 AM2018-02-21T05:32:29+5:302018-02-21T05:32:31+5:30

मुंबई शहरात दिवसभर अवजड वाहनांना प्रवेश बंदी करणा-या वाहतूक विभागाच्या विरोधात, आता वाहतूकदार संघटना आक्रमक झाल्या आहेत.

Conviction of heavy vehicle; Tomorrow's traffic elgars | अवजड वाहन प्रवेशबंदी; उद्या वाहतूकदारांचा एल्गार

अवजड वाहन प्रवेशबंदी; उद्या वाहतूकदारांचा एल्गार

googlenewsNext

मुंबई : मुंबई शहरात दिवसभर अवजड वाहनांना प्रवेश बंदी करणा-या वाहतूक विभागाच्या विरोधात, आता वाहतूकदार संघटना आक्रमक झाल्या आहेत. या प्रवेशबंदीसह दक्षिण मुंबईतील माल वाहतूक वाहनांवर लादलेल्या बंदीच्या वेळेविरोधात, वाहतूकदारांच्या संघटनांनी कर्नाक बंदरमध्ये गुरुवारी निषेध सभेचे आयोजन केले आहे. वाहतूक विभागाने निर्णयाचा फेरविचार करावा, अशी संघटनेची मागणी आहे.
महाराष्ट्र ट्रक ओनर्स असोसिएशन आणि महाराष्ट्र राज्य मोटर मालक संघ यांनी संयुक्तपणे, कर्नाक बंदर येथील पी.डीमेलो भवनमध्ये गुरुवारी, २२ फेब्रुवारीला सायंकाळी ४ वाजता सभेचे आयोजन केले आहे. या सभेत वाहतूक विभागाच्या निर्णयाविरोधात एल्गार केला जाईल. तूर्तास वाहतूक विभागाने मुंबई शहरात सकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत अवजड वाहनांवर प्रवेशबंदी लादली आहे, तर माल व प्रवासी वाहतूक करणाºया वाहनांना दक्षिण मुंबईमध्ये सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत आणि सायंकाळी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत वाहतुकीस बंदी घातली आहे. मात्र, ही बंदी अयोग्य असून, ती तत्काळ मागे घ्यावी, अशी मागणी संघटनांनी केली आहे.

Web Title: Conviction of heavy vehicle; Tomorrow's traffic elgars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.