मुंबई : कोकण विभागातील शिक्षक मतदार संघातील निवडणूक अधिक रंगतदार स्थितीवर पोहोचली आहे. महाराष्ट्र काँग्रेस शिक्षक सेलने शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाला पाठिंबा जाहीर केल्यामुळे, सेलचे उपाध्यक्ष महादेव सुळे यांनी बंडखोरी केली आहे, तर शिक्षक परिषदेतून बंडखोरी करत, माजी आमदार रामनाथ मोते यांनी सोमवारी अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे.मंगळवारी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय महादेव सुळे यांनी जाहीर केला आहे. सेलतर्फे कोकण मतदारसंघामध्ये सुळे यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. मात्र, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेतर्फे उभे असलेल्या वेणूनाथ कडू यांना टक्कर देण्यासाठी काँग्रेसने शेकापला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नाराज झालेल्या सुळे यांनी अपक्ष उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. याउलट शिक्षक परिषदेने कडू यांना उमेदवारी दिल्यानंतर, बंडखोर आमदार रामनाथ मोते यांनी सोमवारी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. (प्रतिनिधी)>मोते यांना विविध संघटनांचा पाठिंबामोते यांना अनेक संघटनांनी सोमवारी पाठिंबा घोषित केला आहे. त्यात आदिवासी वसतिगृह समिती, मायनॉरिटी शिक्षक सेल, मुख्याध्यापक संघ, मुंबई शिक्षक पतपेढी, पालघर शिक्षक परिषदेसह विविध जिल्ह्यांतील शिक्षक संघटनांनी मोते यांना पाठिंबा दिला.
काँग्रेस शिक्षक सेलच्या उपाध्यक्षांची बंडखोरी
By admin | Published: January 17, 2017 6:28 AM