दीक्षान्त सभारंभ २४ जानेवारीला
By Admin | Published: January 11, 2015 01:27 AM2015-01-11T01:27:51+5:302015-01-11T01:27:51+5:30
मुंबई विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ २४ जानेवारीला आयोजित करण्यात आला आहे. या समारंभात दीड लाख विद्यार्थ्यांना पदवी, पदविका प्रदान करण्यात येतील.
मुंबई : मुंबई विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ २४ जानेवारीला आयोजित करण्यात आला आहे. या समारंभात दीड लाख विद्यार्थ्यांना पदवी, पदविका प्रदान करण्यात येतील. यापूर्वी दीक्षान्त समारंभ केवळ विद्यापीठात होत असे. परंतु यंदापासून प्रथमच हा सोहळा महाविद्यालयांमध्येही आयोजित करण्याच्या सूचना विद्यापीठाने दिल्या आहेत.
शैक्षणिक वर्ष २0१३-१४ या वर्षात विद्यापीठातून पदवी आणि पदविका प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना २४ जानेवारी रोजी ११ वाजता दीक्षान्त समारंभात पदवी प्रदान करण्यात येणार आहेत. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने घेतलेल्या निर्णयानुसार यंदापासून प्रथमच महाविद्यालयांमध्येही दीक्षान्त समारंभ साजरा होणार आहे. महाविद्यालयांना दुपारी ३ ते ६ या वेळेत दीक्षान्त समारंभ आयोजित करावा लागणार आहे. तसेच या समारंभासाठी मान्यवर व्यक्तीस अतिथी म्हणून आमंत्रित करावे, अशी सूचनाही विद्यापीठाने केली आहे. या समारंभात महाविद्यालयांनी विद्यापीठातील दीक्षान्त सोहळ्यातील प्रमुख अतिथींच्या भाषणाची चित्रफीत दाखवावी, अशी सूचनाही विद्यापीठाने महाविद्यालयांना केली आहे. याबाबत १४ जानेवारीला कुलगुरू डॉ. राजन वेळुकर यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता कलिना कॅम्पसमधील मराठी भाषा भवनात विशेष बैठक आयोजित करण्यात आली असून, या बैठकीला प्राचार्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन परीक्षा नियंत्रक दिनेश भोंडे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
महाविद्यालयांनी विद्यापीठातील दीक्षान्त सोहळ्यातील प्रमुख अतिथींच्या भाषणाची चित्रफीत दाखवावी, अशी सूचनाही विद्यापीठाने केली आहे.