मुंबई - कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) आणि आभासी वास्तव(व्हर्च्युअल रिऍलिटी)च्या माध्यमातून आयआयटी बॉम्बेचा 58 वा दीक्षांत सोहळा पार पडला. नोबेल पारितोषिक विजेते प्राध्यापक डंकन हॅल्डेन आणि स्टिफन शेवार्झमन हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख पाहुणे आणि सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना कोविड 19 च्या काळातही आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून कशा पद्धतीने मार्गदर्शन करायला हवे त्यासंदर्भात मार्गदर्शन केले.कोविड19 च्या पार्श्वभूमीवर यंदाचा दीक्षांत सोहळा प्राध्यापकांच्या मेहनतीच्या माध्यमातून ऑनलाईन पार पडला. यासाठी आयआयटीच्या प्राध्यापकांकडून विशेष एप्लिकेशनची निर्मिती करण्यात आली ज्यामध्ये प्रत्येक पदवीधर विद्यार्थ्याला आपला आभासी अवतार समारंभाच्या पोशाखात दिसला आणि स्वतः संचालकांकडून पदवी प्राप्त करीत असल्याचे दिसणार आहे. यंदा विद्यार्थ्यांना पदवी प्राप्त करण्याचा क्षण प्रत्यक्ष अनुभवता येणार नसला तरी या माध्यमातून त्यांना तो क्षण आयुष्यभरासाठी जपता येणार आहे. सह्याद्री, डिश टीव्ही यासोबत युट्युब आणि फेसबुकवर हा दीक्षांत सोहळा प्रसारित करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या आभासी व्यक्तिरेखाच्या माध्यमातून आयआयटी बॉम्बेचा दीक्षांत सोहळा पडला पार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2020 5:15 PM