मुंबई : मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारंभ २२ फेब्रुवारीला फोर्ट कॅम्पसमधील मुंबई विद्यापीठाच्या सर कावसजी जहांगीर सभागृह, दीक्षान्त सभागृह सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या दीक्षांत समारंभाला आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ व इस्त्रोचे माजी अध्यक्ष डॉ. किरण कुमार हे प्रमुख पाहुणे दीक्षान्त भाषण करणार आहेत. यंदा मुलींची बाजी दिसून येत आहे. कारण, १ लाखाहून अधिक विद्यार्थिनींना पदव्या बहाल करण्यात येणार आहे.बुधवारी दीक्षान्त समारंभ मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्र-कुलगुरू डॉ. व्ही. एन. मगरे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे. या वर्षीच्या दीक्षान्त समारंभामध्ये पदवी आणि पदव्युत्तर मिळून विविध विद्याशाखांतील एकूण १ लाख ८७ हजार ५६७ स्नातकांना पदव्या प्रदान करण्यात येणार आहेत. यामध्ये १ लाख १ हजार ५१० विद्यार्थींनी तर ८६ हजार ५७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.यामध्ये पदवीसाठी १ लाख ५८ हजार ९९ तर पदव्युत्तर २९ हजार ४६८ विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान केल्या जाणार आहेत.शाखानिहाय आकडेवारीनुसार, यावर्षीच्या दीक्षान्त समारंभात कलाशाखेतील २८ हजार ५२४, विज्ञान शाखेतील २३ हजार ९१९, वाणिज्य शाखेतील ८० हजार ९६५, तंत्रज्ञान शाखेतील २९ हजार ५३६, व्यवस्थापन १७ हजार ८४२, आणि विधी शाखेतील ६ हजार ७८१ पदव्यांचा समावेश आहे.कला विद्याशाखेतील १२४, विज्ञान विद्याशाखेतील ११४, वाणिज्य शाखेतील ३१, विधी शाखेती ५, तंत्रज्ञान शाखेतील ३० अशा ३२२ स्नातकांना विद्यावाचस्पती(पी.एचडी) आणि विविध शाखेतील ७५ स्नातकांना एमफिल पदव्या प्रदान करण्यात येणार आहेत. तर १९ एमएस्सी बाय रिसर्च स्नातकांना पदव्या प्रदान करण्यात येणार आहेत. विद्यापीठाच्या विविध परीक्षांमध्ये प्राविण्य संपादन केलेल्या ४४ विद्यार्थ्यांना ५९ पदके बहाल करण्यात येणार आहेत. ज्यामध्ये ५७ सुवर्ण, एक रौप्य आणि एक कास्य पदकांचा समावेश आहे.
आज मुंबईत दीक्षान्त समारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 12:55 AM