मुंबई विद्यापीठाचा दीक्षान्त सोहळा होणार ऑनलाइन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2021 05:51 AM2021-01-23T05:51:33+5:302021-01-23T05:51:58+5:30
पदवी व पदविका प्रमाणपत्रे दीक्षान्त समारंभ झाल्यानंतर संबंधित महाविद्यालयात पाठविण्यात येणार असून, त्यांचे वितरण विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालय पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभात करेल.
मुंबई :मुंबई विद्यापीठाचा २०२०चा दीक्षान्त समारंभ १ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ११ वाजता ऑनलाइन होईल. या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण मुंबई विद्यापीठाच्या www.mu.ac.in या संकेतस्थळावरून होईल.
पदवी व पदविका प्रमाणपत्रे दीक्षान्त समारंभ झाल्यानंतर संबंधित महाविद्यालयात पाठविण्यात येणार असून, त्यांचे वितरण विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालय पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभात करेल. २०१९च्या दीक्षान्त समारंभामध्ये पदवी, पदव्युत्तर मिळून विविध विद्याशाखांतील एकूण १,६८,२३९ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यावर्षी २ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी पदवी प्राप्त कतील.
http://muexam.mu.ac.in/ convocationstudents/ या संकेतस्थळावर पदवीचा तपशील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे.