विविध शाखांतील १,६८,२३९ विद्यार्थ्यांना मिळणार पदवी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई विद्यापीठाचा २०२०चा दीक्षांत समारंभ १ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ११ वाजता ऑनलाईन होणार आहे. या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण मुंबई विद्यापीठाच्या www.mu.ac.in या संकेतस्थळावरून होईल.
विद्यापीठाने घेतलेल्या प्रथम सत्र २०२०च्या पदवी, पदव्युत्तर व पदविका परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी तसेच जे विद्यार्थी दीक्षांत समारंभापूर्वी पदवी व पदविका परीक्षेत उत्तीर्ण झाले असतील ते सर्व पदवी घेण्यास पात्र ठरतील. पदवी व पदविका प्रमाणपत्रे दीक्षांत समारंभ झाल्यानंतर संबंधित महाविद्यालयात पाठविण्यात येणार असून, त्यांचे वितरण विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालय पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभात करेल. २०१९च्या दीक्षांत समारंभामध्ये पदवी आणि पदव्युत्तर मिळून विविध विद्याशाखांतील एकूण १,६८,२३९ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यावर्षी २ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी पदवी प्राप्त करणार आहेत.
पदवी प्रमाणपत्रावरील मराठी (देवनागरी) नावाचा तपशील विद्यार्थी व महाविद्यालयांना तपासणीसाठी २७ जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत उपलब्ध करून देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या http://muexam.mu.ac.in/convocationstudents/ या संकेतस्थळाला भेट देऊन आपल्या पदवीचा तपशील पाहावा, असे आवाहन विद्यापीठाने केले आहे.
...........................