कूपर हॉस्पिटलला दिली आठ लाखांची औषधे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:06 AM2021-05-29T04:06:42+5:302021-05-29T04:06:42+5:30
कूपर हॉस्पिटलला दिली आठ लाखांची औषधे मुंबई - विलेपार्ले पश्चिम येथील कूपर हॉस्पिटलला शुक्रवारी कोविड-१९ च्या रुग्णांसाठी लागणारी ...
कूपर हॉस्पिटलला दिली आठ लाखांची औषधे
मुंबई - विलेपार्ले पश्चिम येथील कूपर हॉस्पिटलला शुक्रवारी कोविड-१९ च्या रुग्णांसाठी लागणारी आठ लाख रुपयांची औषधे व इंजेक्शन्स भेट देण्यात आली.
शिवसेना शाखा क्र. ६३ चे गटप्रमुख सचिन नायक यांच्या प्रयत्नाने, महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या सहकार्याने व शाखा क्र. ६३ च्यावतीने शाखाप्रमुख सुबोध सुरेश चिटणीस व अजित सावंत यांनी कूपर रुग्णालयाला ८,००,००० रुपयांची कोविड-१९ च्या रुग्णांसाठी लागणारी महत्त्वपूर्ण औषधे व इंजेक्शन्स कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. पिनाकीन गुज्जर व डॉ. भावसार यांना सुपूर्द केली.
याप्रसंगी गटप्रमुख हकीम खान, तबारक शेख, विनोद ठुकरुल, राजेश चव्हाण, नरसिंग गायकवाड, डॉ. सुरेश कदम आदी उपस्थित होते.
------------------------