मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी सहकार्य करा: मुंबई मनपाचे आवाहन

By सीमा महांगडे | Published: January 21, 2024 08:36 PM2024-01-21T20:36:04+5:302024-01-21T20:36:31+5:30

मंगळवारपासून सर्वेक्षणाला सुरुवात होणार

Cooperate for survey of Maratha community: Appeal from Mumbai Municipal Corporation | मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी सहकार्य करा: मुंबई मनपाचे आवाहन

मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी सहकार्य करा: मुंबई मनपाचे आवाहन

मुंबई:मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागर‍िकांच्या सर्वेक्षणाचे कामकाज उद्यापासून पासून सुरू होणार आहे. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या आदेशानुसार करण्यात येणारे हे सर्वेक्षण बृहन्मुंबई महानगरपाल‍िका क्षेत्रात देखील करण्यात येणार असून यासाठी पालिकेचा सहभाग  असणार असून पालिकेचे अध‍िकारी व कर्मचारी मुंबई शहर आण‍ि मुंबई उपनगर या दोन्ही जिल्ह्यात सर्वेक्षण करणार आहेत. त्यामुळे या प्रशासकीय कामासाठी आपल्या घरी, अपार्टमेंट मध्ये, सोसायटीत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना योग्य ते सहकार्य करा, असे आवाहन पाल‍िका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

मंगळवारपासून मुंबईत सुरू होणाऱ्या सर्वेक्षणासाठी पाल‍िकेचे अध‍िकारी आण‍ि कर्मचाऱ्यांना प्रगणक व पर्यवेक्षकाचे प्रश‍िक्षण देण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या आदेशानुसार निर्धारित करण्यात आलेले प्रश्न या प्रगणक व पर्यवेक्षकांकडून नागरिकांना व‍िचारण्यात येणार आहेत. या माध्यमातून आवश्यक ती माहिती गोळा करण्यात येणार आहे.
--------------------
नागरिकांनी सहकार्य करावे
या सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर प्रश‍िक्ष‍ित कर्मचारी मंगळवारपासून आपल्या घरी, सोसायटी आण‍ि अपार्टमेंटमध्ये येतील. संबंध‍ित कर्मचाऱ्यांकडे स्वत:चे ओळखपत्र असेल. त्यामुळे सर्वेक्षणासाठी येणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपाल‍िकेच्या कर्मचाऱ्यांना मुंबईकरांनी सहकार्य करावे आण‍ि त्यांना अपेक्ष‍ित असलेली माह‍िती भरून दयावी अशी विनंती पालिकेकडून करण्यात आली आहे. ही माहिती भ्रमणध्वनीवर आधारित एका ॲपमध्ये नोंदविण्यात येणार असून माहिती नोंदविल्यानंतर माहिती देणाऱ्याची स्वाक्षरी देखील ॲप मध्ये ज़तन केली जाणार आहे. तयामुळे मुंबई पाल‍िका हदीतील रह‍िवाशांनी या सर्वेक्षणासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.
-----------
अभियंत्यांना वगळण्याची मागणी
अशा सर्वेक्षणाच्या कामांमध्ये कर्मचाऱ्यांना गुंतवून ठेवल्यास चालू असलेल्या कामाचा दर्जा राखणे शक्य होणार नाही, असे बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनीअर्स युनियनने म्हटले आहे.  या कामासाठी मुंबईतील २४ विभागांमधून सुमारे २० ते २५ हजार कर्मचारी घेतले जाणार असल्याचा दावा कामगार संघटनांकडून करण्यात आला आहे. पालिकेत सध्या अभियंत्यांची सुमारे ७०० पदे रिक्त असून कार्यरत अभियंत्यांना अतिरिक्त वेळेत अधिक काम करावे लागत आहे. सर्वेक्षण करणे ही तांत्रिक बाब  नसल्याचे पत्र युनियनकडून आयुक्तांना पाठविण्यात आले होते  

Web Title: Cooperate for survey of Maratha community: Appeal from Mumbai Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.