Join us

‘टीसीला सहकार्य करा, अन्यथा कारवाई’; मध्य रेल्वेचा प्रवाशांना स्पष्ट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 5:27 AM

रेल्वे स्थानकांवरील प्रवासी अनेकदा तिकीट तपासनिसाशी गैरवर्तन करतात.  

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : तिकीट खिडक्यांवरील रेल्वे कर्मचारी, तिकीट तपासनीस आणि प्रवाशांमध्ये होणारे वाद नवीन नाहीत. चालू गाडीत तिकीट तपासण्याचे अधिकार नाहीत, असे सांगत एका प्रवाशाने तिकीट दाखविण्यास नकार दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यावर तिकीट तपासनिसांना सहकार्य करा, अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा मध्य रेल्वेच्या विभागीय वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापकांनी दिला आहे.

रेल्वे स्थानकांवरील प्रवासी अनेकदा तिकीट तपासनिसाशी गैरवर्तन करतात.  नुकताच एका प्रवाशाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये  सरकारच्या नियमानुसार चालू रेल्वे गाडीत तिकीट तपासण्याची परवानगी नाही. माझ्याकडे पास आहे, पण मी तो दाखविणार नाही, असे प्रवासी म्हणत आहे. मध्य रेल्वेच्या विभागीय वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापकांनी तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांना सहकार्य करा, एखाद्या प्रवाशाने तपासनिसाला सहकार्य  न केल्यास त्यांच्यावर कारवाई होऊ शकते, असे स्पष्ट केले आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :मध्य रेल्वेमुंबई