Join us

सागरी विज्ञान संशोधनाला सहकार्य -मुख्यमंत्री

By admin | Published: March 28, 2015 1:26 AM

सागरी विज्ञान क्षेत्रात संशोधनात्मक कार्य करणाऱ्या संस्थांना राज्य शासनामार्फत सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुंबई : सागरी विज्ञान क्षेत्रात संशोधनात्मक कार्य करणाऱ्या संस्थांना राज्य शासनामार्फत सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. वर्सोवा येथील सीएसआयआर राष्ट्रीय समुद्र्र विज्ञान संस्थेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्र्याच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी ‘सीएसआयआर’चे संचालक डॉ. नकवी, मुख्य शास्त्रज्ञ डॉ.एस.एस. गजभिये, राजू निकम, जयंत सहस्त्रबुद्धे उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्राला विशाल पर्यावरणसमृद्ध सागरीकिनारा लाभला आहे. या पर्यावरणाचे जतन करण्यासाठी सागरी क्षेत्रात संशोधन करणाऱ्या संस्थांचे कार्य महत्त्वाचे असून, त्याला शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. शासनासोबतच्या एकात्मिक सहकार्याने नैसर्गिक साधनसंपत्तीचे रक्षण करण्यात या संस्था यशस्वी ठरतील, त्याचप्रमाणे समुद्रासह किनारे स्वच्छ ठेवण्यासाठी व पर्यावरणाचे संवर्धनसाठी या संशोधनाचा निश्चितच उपयोग होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी नवीन वास्तू व प्रयोगशाळेची यावेळी पाहणी केली. सागरी समुद्र्र विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. नकवी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)