कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हॉस्पिटल सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:06 AM2021-05-31T04:06:08+5:302021-05-31T04:06:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : भायखळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हॉस्पिटल काेराेनाच्या संभाव्या तिसऱ्या लाटेचा सामाना करण्यासाठी ...

To cope with the third wave of corona, Dr. Babasaheb Ambedkar Memorial Hospital ready | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हॉस्पिटल सज्ज

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हॉस्पिटल सज्ज

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : भायखळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हॉस्पिटल काेराेनाच्या संभाव्या तिसऱ्या लाटेचा सामाना करण्यासाठी आधीपासूनच सज्ज आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हॉस्पिटलमध्ये तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कोरोना लसीकरण केंद्र भायखळा, निर्मल पार्क रेल्वे ऑफिसर कॉलनी, तसेच परळ कार्यशाळेमध्ये चालविले जात आहे. ऑक्सिजन पुरवठ्यात स्वयंपूर्ण, लिक्विड मेडिकल ऑक्सिजन प्लांट आणि मेडिकल गॅस पाइपलाइन आणि सक्शन (एमजीपीएस) प्रणाली आधीच अमलात आणली आहे. औषधांचा पुरवठा सुनिश्चित केला जात आहे. बालरोग वाॅर्ड तयार केले जात आहेत व उपकरणेही दिली जात आहेत. वैद्यकीय कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण दिले जात आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हॉस्पिटल २४x ७ तास कोरोना फ्लू ओपीडी, कोरोना कॅज्युअलिटी, २४x७ कोरोना अलगीकरण केंद्रे, २४x७ कोरोना रुग्णवाहिका सेवा, तसेच कोविड चाचणी सुविधेद्वारे रुग्णांना मोठ्या प्रमाणात सेवा देत आहे. हे हॉस्पिटल १५ जुलै २०२० रोजी कोरोना हॉस्पिटल म्हणून कार्यरत झाले, तेव्हापासून आजपर्यंत येथे हजाराहून अधिक इनडोअर कोरोना रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत आणि जवळजवळ ९,५०० कोरोना आरटीपीसीआर चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

कोरोना आयसीयूमध्ये विविध तज्ज्ञ डॉक्टर (डॉक्टर, ॲनेस्थेटिस्ट, ईएनटी सर्जन, पल्मोनरी स्पेशालिस्टस्‌, मानसोपचारतज्ज्ञ) आयसीयू केअर नर्स, ईसीजी आणि एक्स-रे तंत्रज्ञ, फिजिओथेरपिस्ट, डाएटिशियन इ. समर्पित पीएफटी तंत्रज्ञ, मानसशास्त्र सल्लागार, क्रिटिकल केअर तंत्रज्ञ नियुक्त आहेत. कोरोना आयसीयूसह सर्व कोविड भागात हॉस्पिटल इन्फेक्शन प्रिव्हेंशन कंट्रोल (एचआयपीसी) उपायांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाते. वस्तूंचे कोविड मायक्रोवेव्ह निर्जंतुकीकरण प्रणालीद्वारे निर्जंतुकीकरण केले जाते.

...................................

Web Title: To cope with the third wave of corona, Dr. Babasaheb Ambedkar Memorial Hospital ready

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.