वसई : आचोळे येथील जमिनीच्या कागदपत्रांमध्ये बेकायदा फेरफार केल्याप्रकरणी शिवसेना नगरसेवक धनंजय गावडे यांच्यासह तेरा जणांविरोधात तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. प्रमोदकुमार रल्हन यांनी आचोळे येथील सर्व्हे क्रमांक २४० हिस्सा क्रमांक १ ही जागा आपल्या वडिलांनी खरेदी केली असताना बनावट दस्ताऐवज तयार करून विकण्यात आल्याची तक्रार केली होती. या तक्रारीवरून तुळींज पोलिसांनी लुईस दिब्रित, सायमन दिब्रित, कोशाव कोन, जॉनी घोसाल, इजाबेल दिब्रित, वाल्टर घोन्सालविस, ललिता लोपीस, विल्यम घोन्सालवीस, मार्शल घोन्सालवीस, नॅन्सी घोन्सालवीस, कल्पेश राठोड, धनंजय गावडे, रॉड्रीक्स यांच्याविरोधात गुरुवारी फसवणुकीची गुन्हा झाला. खरेदीतील फेरफारासंदर्भात रल्हन यांनी तक्रार केल्यानंतर तुळींज पोलिसांनी कोणतीही बाब न तपासता सुडबुद्धीने गुन्हा दाखल केला असून मला अडकवण्याचा प्रयत्न काही धनदांडग्या बिल्डरांनी केला आहे. हा कट लवकरच उधळला जाईल, असे गावडे यांच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
सेना नगरसेवकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल
By admin | Published: January 14, 2017 4:54 AM