कोअर कमिटीत झाला राजीनामा देण्याचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2019 02:48 AM2019-11-09T02:48:25+5:302019-11-09T02:49:15+5:30

राज्यातील जनतेने आम्हाला सत्तेसाठी जनादेश दिलेला आहे.

Core committee decides to resign of devendra fadanvis | कोअर कमिटीत झाला राजीनामा देण्याचा निर्णय

कोअर कमिटीत झाला राजीनामा देण्याचा निर्णय

Next

मुंबई: भाजप-शिवसेनेची सत्तास्थापनेबाबतची कोंडी कायम असताना भाजपच्या कोअर कमिटीची बैठक मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झाली आणि तीत राजभवनवर जाऊन राजीनामा देण्याचा निर्णय घेण्यात आला. काही सहकारी मंत्र्यांसह फडणवीस राजभवनावर गेले आणि त्यांनी राजीनामा सादर केला. त्यानंतर पत्र परिषद घेऊन त्यांनी राजीनाम्याची घोषणा केली. काळजीवाहू मुख्यमंत्री असताना तुम्हाला धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत, असे बंधन राज्यपालांनी फडणवीस यांच्यावर टाकले आहे.

राज्यातील जनतेने आम्हाला सत्तेसाठी जनादेश दिलेला आहे. त्या जनादेशाचा अनादर करणं हे आमचं कर्तव्य आहे. राज्यावर पुन्हा निवडणूक लादणं हे चुकीचं ठरेल. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. अशावेळी निवडणूक लादण्याऐवजी स्थिर सरकार मिळाले पाहिजे, त्यासाठी आपण योग्य ते प्रयत्न करू.

फोडाफोडीचं राजकारण कधीही करणार नाही
मुख्यमंत्री म्हणाले की, भाजपने आमदारांच्या खरेदीचे प्रयत्न चालविले असल्याचा आरोप मीडियामध्ये प्रसिद्धी मिळविण्यासाठी काही जण करीत आहेत. असं फोडाफोडीचं राजकारण भाजप कधीही करणार नाही. जे आरोप करतात त्यांनी ते सिद्ध करावे असे माझे आव्हान आहे.

Web Title: Core committee decides to resign of devendra fadanvis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.