अक्षय कुमारच्या रामसेतू चित्रपटाचे चित्रीकरण करणाऱ्या ४५ क्रू मेंबर्सना कोरोना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:05 AM2021-04-06T04:05:02+5:302021-04-06T04:05:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारला कोरोनाची बाधा झाली आहे. त्यानंतर आता त्याची मुख्य भूमिका असणाऱ्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारला कोरोनाची बाधा झाली आहे. त्यानंतर आता त्याची मुख्य भूमिका असणाऱ्या रामसेतू चित्रपटाचे चित्रीकरण करणाऱ्या ४५ क्रू मेंबर्सनाही कोरोना झाल्याचे समाेर आले आहे. त्यामुळे सध्या रामसेतू चित्रपटाचे चित्रीकरण थांबविण्यात आले आहे.
अक्षयच्या बहुचर्चित रामसेतू चित्रपटाचे मुंबईतील मढ येथे चित्रीकरण सुरू आहे. आपली कोरोना चाचणी रविवारी पॉझिटिव्ह आल्याचे अक्षयने स्वतः ट्विट करून सांगितल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून या चित्रीकरणावेळी हजर सर्व कलाकार तसेच क्रू मेंबर्सची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यावेळी यातील ७५ पैकी ४५ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. या सर्व कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, रविवारी महाराष्ट्र सरकारने घातलेल्या निर्बंधांमध्ये चित्रपटाच्या चित्रीकरणाला सूट देण्यात आली असली तरी चित्रपटाच्या सेटवर एकाच वेळी ४५ जण कोरोनाबाधित सापडल्याने चित्रपट क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
.....................