राज्यात बुधवारी कोरोनाचे ४६ हजार ७८१ रुग्ण, ८१६ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:06 AM2021-05-13T04:06:39+5:302021-05-13T04:06:39+5:30

मुंबई : राज्यात बुधवारी दिवसभरात ४६ हजार ७८१ रुग्ण आणि ८१६ मृत्यूंची नोंद झाली आहे; तर दुसरीकडे दिवसभरात बरे ...

Corona 46 thousand 781 patients, 816 deaths in the state on Wednesday | राज्यात बुधवारी कोरोनाचे ४६ हजार ७८१ रुग्ण, ८१६ मृत्यू

राज्यात बुधवारी कोरोनाचे ४६ हजार ७८१ रुग्ण, ८१६ मृत्यू

Next

मुंबई : राज्यात बुधवारी दिवसभरात ४६ हजार ७८१ रुग्ण आणि ८१६ मृत्यूंची नोंद झाली आहे; तर दुसरीकडे दिवसभरात बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले आहे. दिवसभरात ५८ हजार ८०५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, एकूण ४६ लाख १९६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यात उपचाराधीन रुग्णांची संख्या साडेपाच लाखांच्या खाली आली असून सध्या पाच लाख ४६ हजार १२९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८.०१ टक्के असून मृत्युदर १.४९ टक्क्यांवर आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या तीन कोटी एक लाख ९५८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७.३६ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३६ लाख १३ हजार व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर २९ हजार ४१७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आता राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५२ लाख २६ हजार ७१० आहे, तर मृतांचा एकूण आकडा ७८ हजार ७ आहे. दिवसभरात नोंद झालेल्या ८१६ मृत्यूंपैकी ३७८ मृत्यू हे मागील ४८ तासांतील, तर १९३ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित २३६ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक काळापूर्वीचे आहेत. या ८१६ मृत्यूंमध्ये मुंबई ६६, ठाणे ६, ठाणे महापालिका ९, नवी मुंबई महापालिका १६, उल्हासनगर मनपा १, भिवंडी निजामपूर मनपा ४, पालघर १, वसई विरार मनपा ८, रायगड ११, पनवेल मनपा ७, नाशिक ३४, नाशिक मनपा ४१, मालेगाव मनपा ३, अहमदनगर २२, अहमदनगर मनपा १०, धुळे १, धुळे मनपा २, जळगाव १३, जळगाव मनपा १०, नंदुरबार १, पुणे ३३, पुणे मनपा ४०, पिंपरी-चिंचवड मनपा १, सोलापूर ३१, सोलापूर मनपा ४, सातारा १६, कोल्हापूर २६, कोल्हापूर मनपा ३, सांगली १८, सांगली-मिरज कुपवाड मनपा २, सिंधुदुर्ग १५, सातारा ८, औरंगाबाद १२, औरंगाबाद मनपा १, जालना २५, हिंगोली १०, परभणी ९, परभणी मनपा ४, लातूर १२, लातूर मनपा ३, उस्मानाबाद २०, बीड ५०, नांदेड १८, नांदेड मनपा ५, अकोला १३, अकोला मनपा ५, अमरावती १२, अमरावती मनपा ५, यवतमाळ १४, बुलढाणा ६, वाशिम १०, नागपूर १९, नागपूर मनपा ३५, वर्धा १०, भंडारा २३, गोंदिया ३, चंद्रपूर १८, चंद्रपूर मनपा ९, गडचिरोली २, इ. रुग्णांचा समावेश आहे.

Web Title: Corona 46 thousand 781 patients, 816 deaths in the state on Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.