कोरोना : ७० टक्के जनता झोपड्यात राहते; त्यांना कोरोनापासून वाचावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 12:59 PM2020-03-29T12:59:07+5:302020-03-29T13:00:44+5:30

मुंबईत मोट्या प्रमाणावर झोपड्या आहेत. या झोपड्यात मुंबईची ७० टक्के जनता राहते.

Corona: 70 percent of the population lives in huts; Read them from Corona | कोरोना : ७० टक्के जनता झोपड्यात राहते; त्यांना कोरोनापासून वाचावा

कोरोना : ७० टक्के जनता झोपड्यात राहते; त्यांना कोरोनापासून वाचावा

Next

कोरोना : ७० टक्के जनता झोपड्यात राहते; त्यांना कोरोनापासून वाचावा

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाच प्रसार थांबविण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत. कोरोनातून बरे होत असलेल्यांची संख्या वाढत असली तरी त्याचा प्रसार कमी होत नाही. मुंबईत मोट्या प्रमाणावर झोपड्या आहेत. या झोपड्यात मुंबईची ७० टक्के जनता राहते. परिणामी त्यांच्या सुरक्षेसाठी येथे जंतुनाशक फवारा. शौचालय स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करा. येथे कोरोना शिरकाव करणार नाही यासाठी जे करता येईल ते करा, असे म्हणणे सामाजिक संस्थांनी मांडले आहे.

मुंबईमध्ये कोरोना वायरसचे अनेक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. त्यामुळे शासन व महानगर पालिकेची झोपच उडाली आहे. म्हणूनच देशासहित मुंबईमध्ये सुद्धा लॉक डाऊन करण्यात आले आहे. कोरोना विरुद्ध लढण्यासाठी शासन आणि महानगरपालिका अग्निशमन मार्फत मुंबईमधील सर्व रोड आणि इमारती यांना औषध फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्याचे काम सुरू केले आहे. परंतु मुंबईमधील ७० टक्के जनता ही झोपडपट्टीमध्ये राहते. आणि ही जनता हातांवर पोट घेऊन जगणारी आहे. मुंबईमध्ये लॉक डाऊन असला तरी यांना आपल्या कुटुंबाच्या रोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी घरातून बाहेर पडावे लागत आहे. एव्हढेच काय तर या झोपडपट्टयामध्ये सार्वजनिक शौचालय असतात; त्यामुळेच त्यांना सकाळी शौचास जाण्यासाठी बाहेर पडावेच लागते. तेथे त्यांना रांगेत उभे राहावे लागते. तसेच या नागरिकांना पिण्याचे पाणी भरण्यासाठी सुद्धा बाहेर पडावे लागते. त्यांना सार्वजनिक नळावर जाऊन पुन्हा रांग लावून पाणी भरावे लागते. त्यामुळे त्यांना सतत गर्दीमध्ये इच्छा नसताना सुद्धा यावे लागत आहे. त्यातच त्यांच्या झोपडपट्टीतील  शौचालय तुंबले तर त्याच दुर्गंधीमध्ये त्यांना आपला पूर्ण दिवस काढावा लागतो. अशा  दुर्गंधी पूर्ण वातावरणात ह्यांचे जीवन जगणे असह्य झाले आहे. म्हणुन महाराष्ट्र शासन आणि मनपा अग्निशमन दला मार्फत होत असलेल्या  औषध फवारणीची खरी गरज ही मुंबईतील झोपडपट्टीमध्ये जास्त आहे, अशी विनंती फाईट फॉर राईट फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद घोलप यांनी ट्विटरद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महानगरपालिका यांच्याकडे केली आहे.

दरम्यान, केवळ मालाड पश्चिम येथे राईपाडा, भद्रान नगर, भंडार वाडा, कुंभार वाडा, मोटा पाडा, नूतन कॉलनी, एकता नगर, ओरलेम, गौतम बुद्ध नगर, मालवणी, खारोडी, रथोडी, चिंचोली बंदर, राम नगर, राजन पाडा, मार्वे मढ असा मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी परिसर आहे. त्यामुळे प्रत्यके ठिकाणी लक्ष द्या, असे म्हणणे विनोद घोलप यांनी मांडले आहे. 

Web Title: Corona: 70 percent of the population lives in huts; Read them from Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.