खासगी रुग्णालयांतील ७३ वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2020 06:13 AM2020-04-08T06:13:30+5:302020-04-08T06:13:42+5:30

जसलोकमधील २१ तर वोकहार्ट रुग्णालयातील ५२ जणांना संसर्ग

Corona to 73 medical staff at private hospitals | खासगी रुग्णालयांतील ७३ वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोना

खासगी रुग्णालयांतील ७३ वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोना

Next

मुंबई : कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी अक्षरश: जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाºया वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही कोरोनाचा विळखा बसला आहे. वेळोवेळी सुरक्षेचा अभाव असल्याचे निदर्शनास आणूनही यंत्रणाकडून किट्सचा अभाव आढळून आल्यामुळे मुंबईतील दोन प्रतिष्ठित खासगी रुग्णालयांतील ७३ आरÞोग्य सेवकांना कोरोनाची लागण झाली आहे. यात जसलोक रुग्णालयातील २१ आणि वोकहार्ट रुग्णालयातील २१ जण पॉझिटिव्ह आहेत. आरोग्य यंत्रणांच्या दृष्टीने ही अत्यंत गंभीर बाब असून यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका नाकारता येत नाही.


जसलोक रुग्णालयात गेल्या आठवड्यात एका आरोग्य सेविकेला कोरोनाची लागण झाली होती. तिच्या सहवासितांचा शोध घेऊन १ हजार पाच वैद्यकीय कर्मचाºयांची कोरोनाची चाचणी करÞण्यात आली. त्यात कमी, अतिजोखमीच्या व्यक्तींचा समावेश होता. यापैकी, ९८४ जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत, तर २१ जण पॉझिटिव्ह आहेत.
कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या आरोग्य सेवकांपैकी एकाचीही प्रकृती गंभीर नसल्याचे जसलोक रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे. २१ जणांपैकी १९ जणांना तीव्र तर अन्य दोघांना सौम्य लक्षणे आहेत. या आरोग्य सेवकांना कस्तुरबा रुग्णालय व सेव्हन हिल्स विलगीकरÞण कक्षात हलविण्यात आले आहे. १३ एप्रिलपासून रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग व अन्य सेवा सुरळीत सुरु करण्याचा विचार असल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले.


मुंबई सेंट्रल येथील वोकहार्ट रुग्णालयातही ५२ आरोग्य सेवकांना कोरोना झाल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे. रुग्णालयात दाखल हृदयविकाराच्या रुग्णामधून हा संसर्ग पसरला आहे, या रुग्णाला औषधोपचारादरम्यान कोरोनाची लक्षणे दिसून आली होती. त्यामुळे रुग्णालय व त्याचा परिसर महापालिका प्रशासनाने प्रतिबंधित केला आहे.
रुग्णालयातील ५०-६० रुग्णांचीही कोरोनाची चाचणी करÞण्यात आली असून त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे प्रशासनाने सांगितले.
याखेरीज, एकूण २७० स्वॅब कोरोना चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली असून त्याचा अहवाल प्रलंबित आहे.

Web Title: Corona to 73 medical staff at private hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.