Join us

कोरोना : मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी महापारेषणकडून सुमारे दीड कोटी रूपये जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 6:07 PM

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एका दिवसाचे वेतन सुमारे १ कोटी ५५ लाख ४३ हजार ३६१ रुपये.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक मदतीसाठी केलेल्या आवाहनाला राज्यातील ऊर्जा विभागाच्या महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीने (महापारेषण) मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एका दिवसाचे वेतन सुमारे १ कोटी ५५ लाख ४३ हजार ३६१ रुपये देऊन प्रतिसाद दिल्याची माहिती महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांनी दिली.

यासंदर्भातील पत्र महापारेषणकडून मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत असलेल्या उपाययोजनांसाठी आर्थिक अडचण येऊ नये, यासाठी ही मदत देण्यात येत असल्याचे महापारेषणने स्पष्ट केले आहे.

महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे म्हणाले, कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीशी सामना करण्यासाठी सरकारकडून योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत. महापारेषणकडूनही योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनीही महापारेषणच्या कामाचे जाहीर कौतुक केले आहे. वीजपुरवठा अखंडित व चांगल्या क्षमतेने ठेवण्यासाठी कर्मचारी परिश्रम घेत आहे. अतिउत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला योग्य बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे, असेही दिनेश वाघमारे यांनी सांगितले.

टॅग्स :कोरोना सकारात्मक बातम्याकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस