कोरोनाबाधितांमध्ये १८ आरोग्य कर्मचारी; संपर्कातील सहा जणांनाही झाली बाधा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 02:02 AM2020-04-27T02:02:17+5:302020-04-27T02:02:28+5:30

मुंबई आणि ठाण्यातील शासकीय व खाजगी रुग्णालयांतील १८ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झालेली आहे.

Corona affected 18 health workers; Six people in contact were also affected | कोरोनाबाधितांमध्ये १८ आरोग्य कर्मचारी; संपर्कातील सहा जणांनाही झाली बाधा

कोरोनाबाधितांमध्ये १८ आरोग्य कर्मचारी; संपर्कातील सहा जणांनाही झाली बाधा

Next

मुरलीधर भवार 
कल्याण : कल्याण-डोंबिवली परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट बनला असून आतापर्यंत या शहरांत राहणाऱ्या मुंबई आणि ठाण्यातील शासकीय व खाजगी रुग्णालयांतील १८ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झालेली आहे. या कर्मचाºयांच्या संपर्कात आलेल्या सहा जणांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
आतापर्यंत केडीएमसीत १२९ रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये डोंबिवली पूर्व ४७, डोंबिवली पश्चिम ३२, कल्याण पूर्व २७, कल्याण पश्चिम १५, टिटवाळा चार आणि मोहने चार असे आहेत. सगळ्यात जास्त रुग्ण हे डोंबिवली शहरात आहेत. आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४६ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये सहा महिन्याच्या लहान बाळासह डायलिसिस रुग्ण आणि ८७ वर्षाच्या आजीचा समावेश आहे. महापालिका हद्दीत ठाणे-मुंबईतील शासकीय व खाजगी रुग्णालयातील १८ कर्मचारी राहतात. याशिवाय पाच पोलीस कर्मचाºयांनाही कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय अंधेरी येथील दोन कर्मचाºयांना कोरोना झाला आहे. हे सर्व वास्तव्याला कल्याण-डोंबिवलीत आहेत. महापालिका हद्दीत राहणाºया शासकीय कर्मचारी आणि आरोग्य सेवेतील कर्मचारी हे बेस्ट आणि राज्य परिवहन महामंडळाच्या विशेष बसमधून प्रवास करतात. डोंबिवलीतील नियॉन रुग्णालय आणि आर. आर. रुग्णालय हे हेल्थ केअर सेंटर म्हणून घोषित केले आहेत.
>२४ मार्चपासून लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर दररोज किमान दोन ते कमाल १४ रुग्ण आढळले आहेत. १४ एप्रिलला महापालिका हद्दीत एकही रुग्ण आढळलेला नव्हता. हा दिवस महापालिकेस दिलासा देणारा ठरला होता.
गर्दी टाळण्यासाठी महापालिका प्रशासन आणि पोलीस आणि बाजर समितीने वेळावेळी विविध आदेश काढले. नागरिकांकडून लॉकडाउनचे संकेत व नियम पाळले जात नाहीत. त्यामुळे रुग्णांचा आकडा वाढत असून ही चिंताजनक बाब आहे. महापालिकेच्या स्तरावर रुग्णांचा उपचार सुरू आहे. डॉक्टरांच्या काही संघटनांच्या मदतीने खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यासाठी महापालिकेने भिवंडी बायपास येथील टाटा आमंत्रा येथे क्वारंटाइनची सोय केली आहे.

Web Title: Corona affected 18 health workers; Six people in contact were also affected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.