मुंबई : कोरोनामुळे देशभरामध्ये लॉकडाउन करण्यात आले असून मुंबईतील बहुतांश भाग सील करण्यात आले आहेत. तसेच अनेक इमारतींच्या गेटवर ‘बाहेरील व्यक्तीस आत प्रवेश नाही,’ अशी पाटी लावण्यात आली आहे. त्यामुळे घरकामगारांना या इमारतीत प्रवेश दिला जात नसल्याने अनेक महिला घरकामगारांवर बेरोजगारीची वेळ आली असल्याने त्यांच्यासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत असल्याने नागरिकांना घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे. मुंबईत लाखो महिला, पुरुष आणि मुली घरांमध्ये जेवण, धुणीभांडी, लहान मुलांचा सांभाळ, वृद्धांची देखभाल करणे यांसारखी कामे करत आहेत. संचारबंदी काळात या लाखो घरकाम करणाऱ्या कामगारांना इमारतीमध्ये प्रवेश मनाई करण्यात आली आहे. यामुळे अनेकांचे पगारही मालकांकडे अडकून पडले आहेत. काही घरकामगारांना मार्चचा पगारदेखील मिळालेला नाही. एप्रिलच्या तर पगाराची आशाच नाही. त्यामुळे कुटुंबाचे आर्थिक नियोजन बिघडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.ज्यांना मार्चचा पगार मिळाला होता, त्यांचा सर्व पगार आतापर्यंत संपून गेला आहे. काही मालकांनी आपल्या घरी काम करणाºया कामगारांचा पगार देण्याची तयारीही दाखवली आहे. मात्र अनेक कामगारांचे बँक खाते नसल्याने त्यांचीदेखील अडचण होत असल्याचे दिसून येते. घरकाम करणाºया कामगारांना इमारत परिसरात प्रवेश दिला जात नसल्याने एप्रिल महिन्यात कामावर जाणेच शक्य झाले नाही. काम न केल्यामुळे तोही पगार मिळेल की नाही याची शंका आता अशा घरकाम करणाºया महिलांनी व्यक्त केली आहे. शिवाय संचारबंदी जर ३ मेनंतर पुन्हा वाढवल्यास परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. एप्रिलची रजा भरपगारी असणार की नाही याबाबत संदिग्धता असल्याचे एका महिलेने सांगितले़
अनेक महिलांचे कोणत्याही बँकेत खाते नाहीअंधेरी, लोखंडवाला, वर्सोवा, जुहू भागात घरकाम करणाऱ्यांमध्ये बºयाचशा महिला या मुंबई डबेवाल्यांच्या पत्नी आहेत. डबेवाल्यांनादेखील मार्च, एप्रिलचा पगार न मिळाल्याने आर्थिक अडचणीत मोठी भर पडली आहे. यापैकी अनेक महिलांचे कोणत्याही बँकेत खाते नाही किंवा त्यांना गुगल पे, फोन पे किंवा पेटीएम वापरता येत नाही. प्रतिबंधित झालेल्या वस्त्यांमधून बाहेर पडता येत नाही. काही ज्येष्ठ घरकामगारांना तर कामावरूनच काढून टाकण्यात आल्याचे समजते. यामुळे त्यांच्यासमोर आता मोठा आर्थिक पेच निर्माण झाला आहे.
मार्च महिन्याचा पगार नाहीसंचारबंदी काळात या लाखो घरकामकरणाऱ्या कामगारांना इमारतीमध्ये प्रवेश मनाई करण्यात आली आहे. यामुळे अनेकांचेपगारही मालकांकडे अडकून पडले आहेत. काही घरकामगारांना मार्चचा पगार मिळालेला नाही.