Join us

क्षयरोग, कुष्ठरोग नियंत्रण मोहिमेअंतर्गत कोरोनाचीही तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2020 4:08 AM

मुंबई : क्षयरोग, कुष्‍ठरोग या आजारांबाबत जनजागृतीसाठी १६ डिसेंबरपर्यंत विशेष शोधमोहीम राबविली जात आहे. या दरम्यान महापालिकेचे कर्मचारी, स्वयंसेवक ...

मुंबई : क्षयरोग, कुष्‍ठरोग या आजारांबाबत जनजागृतीसाठी १६ डिसेंबरपर्यंत विशेष शोधमोहीम राबविली जात आहे. या दरम्यान महापालिकेचे कर्मचारी, स्वयंसेवक ५० लाख मुंबईकरांची तपासणी करतील. शोधमोहिमेदरम्यान कोरोनाच्या अनुषंगानेही तपासणी करावी. कोरोनाचे संशयित रुग्ण आढळल्यास त्यांची चाचणी करून घ्यावी, औषधोपचार करावेत, असे निर्देश महापालिकेचे अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिले.

प्रभादेवी परिसरातील कामगार नगर क्रमांक २ येथून विशेष मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. सर्वेक्षण सकाळी ९ ते दुपारी ४ या कालावधीदरम्‍यान केले जाईल. याअंतर्गत १२ लाख १२ हजार ६९३ घरांतील ५० लाख ९ हजार २७७ व्‍यक्‍तींची तपासणी करण्‍यात येईल. त्यासाठी ३ हजार ४५१ पथके कार्यरत असणार आहेत.

..........................