Join us

corona virus : कोरोनाला गांभिर्याने घ्या, छात्रभारतीकडून 'कोरोना जनजागृती' अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 6:43 PM

प्रसारमाध्यमे व सोशल मिडियाच्या माध्यमांतुन नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे. पण अनेक लोक याकडे अजुनही गांभीर्याने पाहत नाहीत.

मुंबई - राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी छात्रभारती मुंबईच्या वतीने कोरोना जनजागृती अभियान सुरु करण्यात आले आहे. शासन पातळीवर प्रयत्न होत असले तरीही जोवर नागरिकांमध्ये जागृती होत नाही तोपर्यंत या आजाराला रोखणे कठीण आहे. त्यामुळे रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना छात्रभारती घरी बसण्याचे आवाहन करणार आहे. सोबतच आपण आपली काळजी कशी घ्यावी ? आजाराची लक्षणे काय आहेत याचीही माहिती नागरिकांना दिली जात आहे असे छात्रभारती मुंबईचे अध्यक्ष रोहित ढाले यांनी सांगितले. 

प्रसारमाध्यमे व सोशल मिडियाच्या माध्यमांतुन नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे. पण अनेक लोक याकडे अजुनही गांभीर्याने पाहत नाहीत. रस्त्यावर अश्या प्रकारच्या जनजागृतीमुळे नागरिकांमध्ये जागृती होत आहे.टिव्हीवरची जागृती ते आम्ही करत असलेली घरच्या खिडकीसमोरची जागृती या सर्वच स्तरातुन होत असलेल्या जनजागृतीमुळे लोक गांभीर्याने विचार करुन योग्य ती काळजी घेत आहेत असे छात्रभारती मुंबईचे अध्यक्ष रोहित ढाले यांनी सांगितले. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस