कोरोनाची ‘पॉवर’ खल्लास; नवीन लाटेचा धोका नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 06:17 AM2023-04-12T06:17:40+5:302023-04-12T06:17:50+5:30
कोरोना वेगाने पसरत असला तरी पूर्वीप्रमाणे चिंतेचे कारण नाही. कारण, तज्ज्ञांच्या मते या वेळचा संसर्ग खूपच कमकुवत आहे.
नवी दिल्ली :
कोरोना वेगाने पसरत असला तरी पूर्वीप्रमाणे चिंतेचे कारण नाही. कारण, तज्ज्ञांच्या मते या वेळचा संसर्ग खूपच कमकुवत आहे. बाधा झाल्यानंतर रुग्ण जास्तीत जास्त दोन दिवस आजारी पडतो. हा संसर्ग आता सामान्य विषाणूजन्य तापापेक्षाही कमी घातक झाला आहे. आजारी पडणाऱ्या ५ टक्के रुग्णांमध्ये ताप सामान्य आहे. परंतु ज्यांना आधीच गंभीर आजार आहे, त्यांनी सावध राहण्याची गरज आहे.
नवीन लाटेचा धोका नाही
आता नव्या लाटेसारखा धोका नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कारण, ओमायक्रॉनच्याच उपप्रकारामुळे संसर्ग पसरत आहे. कोरोना निःसंशयपणे वेगाने पसरत आहे; परंतु रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची संख्या अद्याप वाढलेली नाही. भविष्यातही अशी भीती नाही, असे तज्ज्ञांनी सांगितले. आयएमए म्हटले की, लोकांनी घाबरून जाऊ नये.
९५ टक्के रुग्णांत लक्षणे नाहीत
देशात गेल्या २४ तासांत...
५,८८० नवे रुग्ण
१४ रुग्णांचा मृत्यू
३,४८१ रुग्ण झाले बरे
३५,१७५ सक्रिय रुग्ण
६.९१% पॉझिटिव्हिटी दर