कोरोनामुळे मेट्रो प्रकल्पांसाठी आवश्यक घटक जपानमध्ये अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:09 AM2020-12-30T04:09:30+5:302020-12-30T04:09:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनामुळे मेट्रो प्रकल्पांसाठी आवश्यक घटकांची वाहतूक जपानमधून येण्यापासून अडकल्याने मुंबई शहर आणि उपनगरात सुरू ...

The corona caused the essential elements for metro projects to get stuck in Japan | कोरोनामुळे मेट्रो प्रकल्पांसाठी आवश्यक घटक जपानमध्ये अडकले

कोरोनामुळे मेट्रो प्रकल्पांसाठी आवश्यक घटक जपानमध्ये अडकले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनामुळे मेट्रो प्रकल्पांसाठी आवश्यक घटकांची वाहतूक जपानमधून येण्यापासून अडकल्याने मुंबई शहर आणि उपनगरात सुरू असलेल्या मेट्रोच्या कामांनाही फटका बसत आहे. मात्र आवश्यक मेट्रोचे घटक येताच मेट्रो चाचणीसाठी तयार होण्याचे निर्देश एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए. राजीव यांनी दिले आहेत.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त आर. ए. राजीव यांनी मंगळवारी चारकोप मेट्रो डेपो आणि मेट्रो-२ अ ला भेट दिली. या वेळी या प्रकल्पांची पूर्तता व्हावी या अनुषंगाने तसेच मेट्रोच्या चाचणीच्या तयारीची त्यांनी पाहणी केली. आर. ए. राजीव यांनी या वेळी सर्व प्रकल्प प्रशासकांना एमएमआरमध्ये आवश्यक मेट्रोचे घटक येताच मेट्रो चाचणीसाठी तयार होण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश दिले.

कामराज नगर स्टेशन दरम्यानच्या महत्त्वपूर्ण लिंक्सनादेखील आयुक्तांनी भेट दिली. शिवाय मेट्रो २ अ चा महत्त्वपूर्ण भाग असलेल्या रेल्वे मार्गावरील दहिसर लिंकलादेखील भेट दिली. नागरी कामांची वेळेवर पूर्तता होण्यासाठी मेट्रो चाचणी सुरू होईपर्यंत आयुक्त अशा भेटी देणार आहेत. आजच्या भेटीदरम्यान आयुक्तांनी लॉकडाऊनमुळे थांबलेल्या प्रकल्पांचे काम गतिमान करण्याच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. जेव्हा ट्रेन येतील तेव्हा त्यांच्या चाचणीसाठी सज्ज राहण्यास त्यांनी सांगितले.

Web Title: The corona caused the essential elements for metro projects to get stuck in Japan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.